JEE Mains 2023 Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच JEE मेन 2023 परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. NTA कडून JEE 2023 परीक्षेची तारीख jeemain.nta.nic.in आणि nta.nic.in वर सूचित केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, JEE Mains 2023 परीक्षा ही जानेवारी आणि एप्रिलमध्ये वर्षातून दोनदा घेतली जाईल. यावर्षी, या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन तारखेबद्दल लवकरच अधिकृत सूचना करण्यात येणार आहे.
दोन सत्रात परीक्षा
जेईई मुख्य परीक्षा 2023 फॉर्म जारी करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु असे मानले जाते की, यावेळी देखील परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारीत तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. दोन्ही सत्रातील उमेदवारांचे गुण चांगले असतील तरच ते अंतिम मानले जातील.
परीक्षा पॅटर्न काय असेल?
विभाग A हा अनिवार्य असेल, एकाधिक निवड प्रश्न (MCQs) असेल तर विभाग B मध्ये असे प्रश्न असतील ज्यांची उत्तरे संख्यात्मक मूल्यांच्या स्वरूपात भरली जातील. A विभागातील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातील. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. विभाग B मध्ये, उमेदवारांना दिलेल्या 10 पैकी कोणतेही पाच प्रश्न विचारायचे आहेत. विभाग B साठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
यंदा 'इतके' विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता
जेईई मेन 2022 मध्ये प्रति सत्र 9.5 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. जेईई मेन 2023 मध्ये अशाच संख्येने विद्यार्थी परीक्षेस बसण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये, 24 उमेदवारांनी 100 पर्सेंटाइल आणि रँक-1 सह परफेक्ट स्कोर मिळवला होता.
विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर बरेच प्रश्न
NTA त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर JEE मुख्य अर्ज फॉर्म 2023 जारी करेल. दरम्यान, या परीक्षेबाबत विद्यार्थी सोशल मीडियावर बरेच प्रश्न विचारत आहेत. येथे, JEE Mains 2023 चे परीक्षार्थी परीक्षेची तारीख, पात्रता आणि इतर माहितीबाबत विचारत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Motivational News : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळवली सव्वा कोटींची शिष्यवृत्ती, वाशिमच्या शेतकरीपुत्राची कमाल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI