JEE Advanced 2020 : जेईई अडव्हान्स 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पुण्यातील चिराग फलोर हा विद्यार्थी देशातून अव्वल आला आहे. गांगुला भुवन रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर तर वैभव राज तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थींनींमध्ये कनिष्का मित्तल पहिली आली आहे. देशातील 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांपैकी 43 हजार 204 विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरले आहे. महाराष्ट्रतील आयआयटी मुंबई झोनचे 24 विद्यार्थ्यांना देशातील टॉप 100 मध्ये स्थान पटकावले आहे.


विद्यार्थी आपला निकाल आयआयटी दिल्लीच्या ऑफिशिअल वेबसाइट jeeadv.ac.in या संकेतस्थाळावर पाहू शकतात. या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 60 हजार 831 विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं. परीक्षेत एकूण 96 टक्के विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये निकाल जाहीर करण्यात आले होते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.


असा पाहा रिझल्ट :


सर्वात आधी ऑफिशिअल वेबसाइट jeeadv.ac.in ओपन करा. त्यानंतर JEE Advanced Results 2020 या लिंकवर क्लिक करावं लागेल. लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर जे नवीन पेज ओपन होईल त्यावर विद्यार्थ्यांनी आपलं क्रेडेंशियल आणि लॉगइन आयडी सबमिट करावं लागेल. क्रेडेंशियल आणि लॉगइन सबमिट केल्यावर विद्यार्थ्यांचा रिझल्ट
स्क्रिनवर दिसेल.


96 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली


जेईई मेंस 2020 चा निकाल जाहीर झाल्यानंतर जेईई अॅडव्हांस 2020 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रोसेस 12 सप्टेंबर 2020 ते 17 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरु होती. 21 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले होते. तर जेईई अॅडव्हान्स 2020 ची परीक्षा 27 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती. जेईई अॅडव्हान्स 2020 ची ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. ज्यामध्ये पहिली परीक्षा सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुसरा टप्पा दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत आयोजित करण्यात आली होती.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI