मुंबई : जगातील विद्यापीठ आणि संस्थांची गुणवत्ता आणि त्यांच्या दर्जाबाबत दरवर्षी ब्रिटीश कंपनी क्यूएस रँकिंगकडून क्रमवारी जाहीर केली जाते. या क्रमवारीमध्ये देशातील महत्त्वाची संस्था असलेल्या आयआयटी मुंबईने देशातील आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. तर आशियातील विद्यापीठांच्या क्रमावारीमध्ये मुंबई आयआयटीने 42 वा क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीची तुलना केली असता आशियातील रँकिंगनुसार 5 क्रमांकाने आयआयटी मुंबईची घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या रँकिंगनुसार आयआयटी मुंबई 37 व्या स्थानावर होते. क्यूएस रँकिंगने मंगळवारी 2022 या वर्षातील विद्यापीठ व संस्थांच्या क्रमवारी जाहीर केली.


आयआयटी मुंबईने यंदा 100 पैकी 71 गुण मिळवत आपले हे स्थान कायम ठेवले आहे. आयआयटी मुंबईला शैक्षणिक प्रतिष्ठेसाठीचे 81.4 गुण मिळाले. तर कर्मचारी सुविधेसाठी 96, प्राध्यापकांच्या कार्यक्षमतेसाठी 23 गुण, विद्यार्थ्यांचे प्रमाण 44.7 गुण, पीएचडी केलेल्या स्टाफची संख्येसाठी 100 गुण, प्राध्यापकांकडून सादर केलेले संशोधन पेपरसाठी 84.2 गुण, आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी 78.5 गुण, आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांची संख्या 11 गुण, संस्थेत शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी 4.4 गुण, अंतर्गत देवाणघेवाण 14.5 गुण, बाह्य देवाणघेवाणीसाठी 8.3 गुण मिळाले आहेत. या 11 मुद्द्यांना देण्यात आलेले गुण हे 100 पैकी आहेत. 11 मुद्द्यांपैकी पीएचडी करणार्‍या कर्मचार्‍यांचा मुद्दा क्रमवारीमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. त्याचप्रमाणे 2022 मध्ये आशियातील विभागीय क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईच्या गुणांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI