मुंबई : शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंग 2025 मध्ये  मुंबई आयआयटी शिक्षण संस्था 118 व्या स्थानी तर देशात मुंबई आयआयटी पहिल्या क्रमांकावर राहिली. महाराष्ट्रातील चार संस्थांचा क्यूएस जागतिक रँकिंगच्या पहिल्या हजार संस्थांमध्ये समावेश आहे. 


जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये मुंबई आयआयटी शिक्षण संस्थेने 118 व्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई आयआयटी शिक्षण संस्था या रँकिंग नुसार भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. 


2024 च्या क्रमवारीत 149 व्या स्थानी असलेल्या आयआयटी मुंबईने आता 118 वे स्थान मिळवले आहे. आयआयटी दिल्ली 150 व्या स्थानी आहे. बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) 211 व्या, आयआयटी मद्रास 227  व्या, आयआयटी कानपूर 263 व्या, दिल्ली विद्यापीठ 328 व्या स्थानी आहे.


राज्यातील आयआयटी मुंबईसह एकूण चार संस्थांनी या यादीत स्थान प्राप्त केले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. 2024 मध्ये 711 ते 720 या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 631 ते 640 या गटात स्थान मिळवले. त्या खालोखाल सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने 641 ते 650 या गटात स्थान प्राप्त केले. गेल्यावर्षी 751 ते 760 या गटात असलेल्या मुंबई विद्यापीठानेही कामगिरी उंचावत यंदा 711 ते 720 या गटात जागा मिळवली आहे. 


शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम, शाश्वतता, आंतरराष्ट्रीय संशोधन अशा निकषांवर उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले आणि त्यानुसार जागतिक जाहीर करण्यात आली.


जागतिक स्तरावर मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पहिले स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानी लंडनचे इम्पिरियल कॉलेज, तिसऱ्या स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे.


ही बातमी वाचा : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI