ICSE and ISC Exam Result 2023 : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज (रविवार) दुपारी 3 वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. मंडळाकडून परीक्षेच्या निकाला संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.


दहावी, बारावी परीक्षांचे निकाल CISCE च्या CAREERS पोर्टलवर आणि CISCE च्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले आयडी आणि पासवर्ड वापरून करिअर्स पोर्टलवर log in करायचे आहे. 


CAREERS पोर्टलवर निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स लक्षात ठेवा 


1. करिअर्स पोर्टलवर लॉग इन (Log In) केल्यावर,'Examination' टायटलवर क्लिक करा.


2. मुख्य मेन्यू बारवर ICSE (दहावी) वर्ष 2023 परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी 'ICSE' वर क्लिक करा आणि ISC (बारावी) वर्ष 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी 'ISC' वर क्लिक करा.


3. ICSE / ISC मेन्यूमधून 'Reports' वर क्लिक करा.


4. शाळेच्या निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी 'Result Tabulation' वर क्लिक करा .


5. निकालाची प्रिंट तपासण्यासाठी 'Comparison Table' वर क्लिक करा.


निकालांशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, शाळेच्या heIpdeskttZcisce.ora येथे CISCE हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. किंवा 1800-203-2414 वर कॉल करू शकता.


CISCE च्या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी https://cisce.orq किंवा https:llresults.cisce.orq या वेबसाईटद्वारे निकालात प्रवेश करू शकतात.


सीआयएससीईच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स लक्षात ठेवा 


1. ICSE (दहावी) 2023 परीक्षेच्या निकालांमध्ये प्रवेश करण्यासाठी, Course ऑप्शनमधून ICSE निवडा आणि ISC (दहावी) 2023 परीक्षेच्या निकालांमध्ये प्रवेश करण्यासाठी  Course ऑप्शनमधून ISC निवडा.


2. निकाल पाहण्यासाठी युनिक आयडी, निर्देशांक क्रमांक आणि CAPTCHA (स्क्रिनवर दाखविल्याप्रमाणे) Enter करा.


3. निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी " प्रिंट " या बटणावर क्लिक करा.


आयसीएसई (ICSE) मार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची (आयसीएसई) परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची (आयएससी) (ISC) परीक्षा 29 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ती 31 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालली होती. यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला देश-विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


महत्त्वाच्या बातम्या : 


CBSE 10th Result 2023 : सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल घोषित, 93.12 टक्के निकाल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI