IBPS Clerk Registration 2023 Last Date : जर तुम्हाला बँकेत नोकरी हवी असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या रिक्त जागा IBPS च्या म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (Institution Of Banking Personnel Selection) Paer क्लर्क (Clerk) या पदासाठी आहेत. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आज अर्जाची शेवटची तारीख आहे. तरी, ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी आजच करा. नंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.
4045 पदे भरण्यात येणार
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (Institution Of Banking Personnel Selection) या भरती मोहिमेद्वारे क्लर्क पदासाठी एकूण 4045 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या बँका आहेत. बँक ऑफ वडोदरा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
ऑनलाईन अर्ज करण्याची, अर्जात सुधारणा करण्याची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 21 जुलै आहे. परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी महाविद्यालयीन पत्र, परीक्षा संघटना आणि ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड ऑगस्ट महिन्यात केले जातील. पूर्व परीक्षेनंतर, मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये होईल आणि तात्पुरते वाटप एप्रिल 2024 पर्यंत केले जाईल.
या वेबसाईटवरून अर्ज करा
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या क्लर्क या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ibps.in. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही भरती प्रक्रियेचे संपूर्ण तपशील नीट भरू शकता.
इतकी फी भरावी लागेल
जर तुम्हाला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या क्लर्क या पदासाठी अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला यासाठी ठराविक शुल्क भरावे लागेल. यामध्ये जर तुम्ही सामान्य श्रेणीतील असाल तर तुम्हाला 850 रुपये शुल्क भरावे लागतील. आणि जर तुम्ही SC, ST, PWBD आणि EXSM या प्रवर्गातील उमेदवार म्हणून अर्ज करणार असाल तर उमेदवारांना 175 रूपये शुल्क भरावे लागतील.
महत्त्वाच्या बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI