HSC, SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. तर दहावीचा (SSC Exam Result News) निकाल जून अखेरीस लागणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी परिस्थितीत नियंत्रणात असल्याने राज्यात ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या.
बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असं बोर्डानं म्हटलं होतं. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून 12 वीचा निकालाबाबतच्या तारखांबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात होते. मात्र या दाव्यांना पूर्णविराम देत शिक्षण मंत्र्यांनी निकालासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. अशातच निकाल नक्की कधी आणि कोणत्या तारखेला लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. (HSC Exam Result News)
कुठे पाहाल निकाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत.
दहावी, बारावीची परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांची संख्या
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्थान बोर्डान बारावीचा निकाल जाहीर केला असून दहावीचा निकाल मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. तर छत्तीसगढ राज्याचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर राज्यांतील दहावी बारावीचे निकाल मात्र अद्याप प्रलंबित आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI