HSC Result 2024 : पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (12th Result 2024) जाहीर झाला असून दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. पण, विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांना रिझल्ट पाहताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी 1 वाजता पालक आणि विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी संकेस्थळावर गेले, पण निकाल जाहीर होताच अवघ्या पाचच मिनिटांत महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. 


बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. मात्र, बोर्डाने दिलेली mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली.


कुठे पाहता येणार निकाल?              



कसा पाहाल निकाल? 



  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

  • निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

  • संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.

  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI