Siddhant Chaturvedi Dating History: गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल (Shubman Gill) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) लेकीच्या अफेअरच्या चर्चांनी इंटरनेट गाजलं. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चाहत्यांना निराशही केलं. पण, आता सारा तेंडुलकरच्या (Sara Tendulkar) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. आता साराचं सूत बॉलिवूडच्या (Bollywood) हँडसम हंकसोबत जोडलं जात असल्याचं बोललं जातंय.
सारा तेंडुलकरचं नाव बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सोबत जोडलं जात आहे. दोघेही अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले, त्यानंतर त्यांच्यातली मैत्री हळूहळू प्रेमात बदल्याचंही बोललं जातंय. फिल्मफेअरनं दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत आणि सारा एकमेकांना डेट करतायत. सूत्रांनी सांगितलं की, ही मैत्री अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत. दोघंही आपलं नातं खासगी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सारासोबत नाव जोडण्यापूर्वी 'या' दोघींसोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हा अभिनेता दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत आहे. दरम्यान, सिद्धांतचं नाव एखाद्या सौंदर्यवतीशी जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अभिनेत्याचं नाव दोन मुलींशी जोडलं गेलं आहे.
सारा तेंडुलकरच्या आधी सिद्धांत चतुर्वेदीबद्दलच्या बातम्या आल्या होत्या की, तो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा नवेली हिला डेट करतोय. या अफवा पहिल्यांदा 2022 मध्ये समोर आल्या होत्या, जेव्हा सिद्धांत आणि नव्या ऋषिकेशमध्ये एकत्र सुट्टीचा आनंद घेत असल्याचं दिसलं होतं. नव्याची आई श्वेता बच्चन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही सिद्धांत दिसलेला. दरम्यान, नव्या किंवा सिद्धांत यांपैकी कोणी कधीच अफेअरबाबत मोकळेपणानं बोललं नव्हतं.
मृणाल ठाकूरसोबतही जोडलेलं नाव
सिद्धांत चतुर्वेदीचं नाव मृणाल ठाकूरशी देखील जोडलं गेलेलं. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, दोघांपैकी कोणीही या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
4 वर्ष मिस्ट्री गर्लला केलंय डेट
सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या कॉलेजमध्ये एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, हे त्यानं स्वतः फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं. सिद्धांतनं सांगितलेलं की, तो त्या मिस्ट्री गर्लसोबत सुमारे चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याला तिच्याशी लग्नही करायचं होतं. मात्र, दोघांमध्ये करिअरवरून वाद झाला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपमुळे अगदी तुटून गेल्याचं सिद्धांतनं सांगितलं.
दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदीनं 'गली बॉय' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेता दीपिका पदुकोणसोबत 'गहराईं' चित्रपटातही दिसला आहे. सिद्धांत सर्वात शेवटी 'युद्ध' चित्रपटात दिसला होता. आता तो तृप्ती डिमरीसोबत 'धडक 2' चित्रपटात दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :