HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्चपासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान दहावी आधी पार पडणाऱ्या बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट आज (बुधवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर, ऑनलाइन उपलब्ध केलं जाणार आहे.
बारावी बोर्डाचं ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीनं प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतंही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कसं कराल डाऊनलोड?
- सर्वात आधी तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेट ब्राऊझरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
- त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाऊनलोड करु शकता.
दरम्यान, संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयानं विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनानं दिली आहे. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचं नाव या संदर्भातील दुरुस्तीबाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईनं डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचं आहे.
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच
दहावी (SSC Board) आणि बारावीच्या (HSC Board) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली होती. दरम्यान, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं लसीकरण अनिवार्य नसेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार? पाहा संपूर्ण माहिती
- SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ, वाचा नियमावली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI