पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज ऑनलाईन परीक्षांमध्ये झालेल्या घोळांचा निषेध करण्यासाठी दिवसभर सुरू असलेलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आलं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच सोबत तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना परत परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि 10 नोव्हेंबरच्या आत अंतिम वर्षाचे 95 टक्के निकाल लागतील असं आश्वासन कुलगुरूंनी दिलं. यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतलं. लॉ चा एक पेपर सिस्टीमधूनच गायब झाल्याचा आरोप अभाविपनं केला होता. यावर बोलताना लॉ चा पेपर सिस्टीम मधून गायब झालेला नाही. त्याचे रेकॉर्ड्स विद्यापीठाकडे आहेत, असं स्पष्टीकरण कुलगुरूंनी दिलं.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांत आज अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आलं. अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्से तांत्रिक अडचणींचा सामना विदियार्थ्यांना करावा लागला. ऑनलाईन परीक्षेमध्ये झालेल्या घोळांचा स्पष्टीकरण मागण्यासाठी अभाविपनं हे आंदोलन केलं होतं.


विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन होणार होतं. पण आंदोलनकर्ते अचानक आक्रमक झाले आणि मुख्य इमारतीसमोरचे बॅरिकेड तोडून आत घुसले. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आंदोलन करत विद्यार्थी बसले. ऑनलाईन परीक्षांमध्ये झालेल्या घोळांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. तसंच लॉ चा एक पेपर सिस्टिममधून गायब झाल्याचा आरोप अभाविपनं केला.


सभागृहामध्ये ठिय्या देऊन बसलेल्या विद्यार्थ्यांशी विद्यापीठाचे प्र कुलगुरु एन एस उमराणींनी संवाद साधला. पण कुलगुरुंशीच बोलायचं अशी भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आणि बाहेर पडणाऱ्या प्र- कुलगुरूंना आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला. जोपर्यंत कुलगुरु येत नाहीत तोपर्यंत जाऊ देणार नाही, अशी भुमिका घेतली. तब्येतीच्या कारणाने कालांतराने प्र कुलगुरु गेले. पण कुलगुरु येईपर्यंत आंदोलनकर्त्यांनी मेन बिल्डिंग समोरच ठिय्या मांडला होता. यानंतर कुलगुरुंनी आंदोलकर्त्यांशी संवाद साधत त्यांना आश्वासनं दिलं आणि हे आंदोलन मागे घेण्यात आलं.


ABVP Protest | विधी परीक्षेच्या घोळावरुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचं आंदोलन



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI