नवी दिल्ली : इंग्लिश हेल्पर एज्युकेशन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (इंग्लिश हेल्पर) आणि हेडवर्ड पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (हेडवर्ड) यांनी महत्त्वाचा करार केला आहे. या कराराद्वारे भारतातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी आधारित अध्ययनात बदल होणार आहेत. या सामंजस्य कराराद्वारे इंग्लिश हेल्परच्या रिडिंग अँड कॉम्प्रेहेन्शन असिस्टंट प्रोग्राम जो एआय संचलित इंग्रजी अध्ययन सोल्यूशन हे हेडवर्डच्या मोठ्या प्रमाणात वितरित होणाऱ्या NCERT-संरेखित शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये एकत्रित केले जाईल. या अभियानाचा उद्देश 7000 शाळांमधील 400000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आहे. याद्वारे त्यांना विद्यार्थ्यांचं मूलभूत इंग्रजी साक्षरतेचे कौशल्य सुधारण्यासाठी त्यांना आकर्षक, अभ्यासक्रम-केंद्रित तंत्रज्ञान-सक्षम साधनांची उपलब्धता प्रदान करण्यात येईल.

Continues below advertisement

करारानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार योग्य शिक्षण साहित्य उपलब्ध होईल. विद्यार्थी ऐकण्याचा सराव, बोलणे, वाचन, लेखन आणि व्याकरणाचा सराव त्यांच्या अभ्यासक्रमानुसार RCA चा वापर करुन करता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना त्वरित अभिप्राय मिळतो ज्यामुळे त्यांना सुधारणांसाठी काय करावे लागेल हे समजते. किफायतशीर वार्षिक फी भरुन इयत्ता आधारित अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांना खरेदी करण्याचा पर्याय असेल. शिक्षकांना देखील वर्गातील सूचनांसाठी मोफत ॲक्सेस देखील मिळेल.

याशिवाय, या करारामुळं  एआय-संचालित विषय-आधारित शिक्षण (एसबीएल), इयत्ता 3 ते 8 च्या विज्ञान मालिकेपासून सुरुवात. एसबीएलमुळं  विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या भाषेत त्यांच्या विषयाचा अभ्यास करण्यास सक्षम करते, याशिवाय आकलन वाढतं आणि सर्वांगीण अध्ययनाचा परिणाम सुधारतो.  सर्व विषय शिकण्यासाठी एसबीएल आरसीएच्या प्रसिद्ध शिक्षणशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा वापर करते. विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे ऑफर करण्यात येणारा, एसबीएल पायलट प्रकल्प दोन्ही संस्थांना येत्या काळात विषय आणि ग्रेडमध्ये प्रवेशाचे मूल्यांकन करण्यास आणि विस्ताराची योजना करण्यास सक्षम करेल.

Continues below advertisement

इंग्लिश हेल्परचे सीईओ दीपक वर्मा यांनी भागीदारीबद्दल बोलताना म्हटलं की,इंग्रजी शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या ध्येयात हेडवर्डसोबतचे सहकार्य हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हेडवर्डच्या विश्वासार्ह इकोसिस्टममध्ये आरसीए एम्बेड करून, आम्ही सर्व समुदायातील विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे, परवडणारे इंग्रजी शिक्षण मिळू शकेल याची खात्री देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजीमध्ये प्राविण्य नाही ते एसबीएलच्या आधारे त्यांच्या विषयांचं अध्ययन  त्यांच्या मातृभाषेचा आधार घेऊन करु शकतात. शिक्षण अधिक समावेशक बनवणे आणि शिक्षणाच्या  परिणामामध्ये सर्वसमावेशक सुधारणा सक्षम करता येतील, असं दीपक वर्मा म्हणाले. 

एबीपी एज्युकेशनचे सीईओ यश मेहता म्हणाले की हे सहकार्य भारतातील शिक्षणासाठी एक परिवर्तनाचा क्षण आहे. आरसीए आणि अग्रगण्य एसबीएलच्या आधारे, विद्यार्थी केवळ त्यांची इंग्रजी भाषेतील साक्षरता बळकट करणार नाहीत तर त्यांच्या पसंतीच्या भाषेत इतर विषय शिकण्याची क्षमता देखील प्राप्त करतील. यातील दुहेरी उद्देश विषय अध्ययन आणि  भाषा हे भविष्यातील सर्वसमावेशक शिक्षणाचे भविष्य दर्शवते. हेडवर्ड आणि इंग्लीश हेल्पर एकत्रितपणे एक अशी शिक्षणाची यंत्रणा घडवत आहेत जी नाविन्यपूर्ण, सुलभ आणि 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांशी जुळणारी आहे.

हेडवर्ड पब्लिशिंगचे अध्यक्ष महेश श्रीवास्तव म्हणाले, हेडवर्ड नेहमीच सशक्त अध्यापनशास्त्र आणि नाविन्यपूर्णतेचे संयोजन करण्यावर विश्वास ठेवते. इंग्लिश हेल्परसोबतची आमची भागीदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार साधनांसह सक्षम करते, असं महेश श्रीवास्तव म्हणाले. एसबीएलद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना त्यांना सर्वात सोयीस्कर असलेल्या भाषेत अभ्यास करण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करुन देत आहोत, ज्यामुळे त्यांची समज अधिक मजबूत होते आणि शिक्षणाचा चांगला परिणाम मिळेल.  

हा सहकार्य करार भारताच्या आगामी पिढीतील शिक्षणाच्या उद्देशांना आकार देण्यासाठी तंत्रज्ञान, उद्देशपूर्ण भागीदारी आणि नवोपक्रमाचा वापर करण्याचा इंग्लिश हेल्पर आणि हेडवर्डच्या सामायिक दृष्टिकोनाला दर्शवते.  

इंग्लिश हेल्पर ही जागतिक शिक्षण तंत्रज्ञान कंपनी असून एआय संचलित सोल्यूशन्स देशातील 27 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील  1 लाख शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय जगभरातील 9 देशात कंपनीचं काम पोहोचलं आहे.  स्वतंत्रपणे आयोजित केलेल्या रँडमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल्स (RCTs) द्वारे मूल्यांकन केलेल्या त्याच्या परिणामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा पाहायला मिळतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सारखं शिक्षण देण्याच्या त्यांच्या ध्येयाला बळकटी मिळते.

 इंग्लिश हेल्परच्या प्रोग्रॅमबद्दल अधिक माहिती आणि संपर्कासाठी   info@englishhelper.com  या ईमेल आयडीवर संपर्क करा किंवा www.englishhelper.com  वेबसाईटला भेट द्या. 

हेडवर्ड पब्लिशिंग कंपनी ही एबीपी एज्युकेशनचा भाग असलेली ELT तज्त्र असलेली आघाडीची अभ्यासक्रम प्रकाशक आहे. जी एबीपी ग्रुपची शैक्षणिक विंग आहे. एबीपी एज्युकेशनवर 20 हजार शाळांचा विश्वास असून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. हेडवर्ड कडून अभ्यासक्रमाशी सुसंगत पाठ्यपुस्तके, शिक्षक संसाधन पुस्तके आणि डिजिटल शिक्षण सोल्यूशन्स पुरवते. ज्यामुळं शिक्षक सक्षम होतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. संशोधन आधारित अध्यापनशास्त्र, रचनात्मक पाठ्य नियोजन, व्यावसायिक विकासादाव्रे हेडवर्ड अध्ययनातील सुधारणा करण्याचा विश्वास हेडवर्ड देते. हा प्रोग्रॅम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि मुलभूत स्तर 2022, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 शी सुसंगत आहे. याद्वारे शाळांना त्यांचं राष्ट्रीय अभ्यासक्रम ध्येय आत्मविश्वासासह मिळवण्यासाठी मदत केली जाते. 

हेडवर्ड संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास  info@headword.in  वर ईमेल करा अथवा www.headword.in    या वेबसाईटला भेट द्यावी. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI