Vikas Divyakirti: दिल्लीतल्या जुन्या राजेंद्रनगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरल्याने युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर दृष्टी आयएएसवर कारवाई करण्यात आली. यानंतर युपीएससीसह देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध झालेले डॉ विकास दिव्यकिर्तीं यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. प्रत्येकाला बळीचा बकरा हवा असतो असं म्हणत त्यांना या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे. एएनआयशी ते बोलत होते. ५० स्थंस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातच आमच्या संस्थेचं नाव असल्याचं ते म्हणाले.

Continues below advertisement

नक्की प्रकरण काय होते?

दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर कोचिंग सेंटरची घटना. संपूर्ण दिल्लीत त्यादिवशी तुफान पाऊस झाला होता. रस्त्यांवर भरपूर पाणी साठलं होतं. दरम्यान राजेंद्रनगरच्या कोचिंगसेंटरमध्ये तळघरात पाणी शिरलं. यूपीएससीचा वर्ग सुरू होता. तळघरात पाणी शिरल्याने वर्गात गोंधळ उडाला. वर्गातून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता. तोही बायोमेट्रिक पद्धतीने उघडता येणारा. तळघरात पाणी शिरल्याने हा दरवाजाही उघडता न आल्याने अनेक विद्यार्थी आत अडकले. आणि यातच तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर महानगरपालिकेने वेगवेगळ्या इमारतींची तळघर सील केली. यात दृष्टी आयएस कोचिंग क्लासेसचाही समावेश होता. या प्रकरणानंतर या संस्थेचे प्रमुख डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मला टार्गेट केले गेले कारण...

तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर विकास दिव्य कीर्तींवर निशाणा साधला गेला. यावर ते म्हणाले अशा प्रकरणात सगळ्यांना एक बळीचा बकरा हवा असतो त्यामुळे मला लक्ष केले जात आहे. यामुळे गोष्टी सोप्या होतात. प्रशासनाला वाटतं आपण सुटलो. समाजालाही असं वाटतं की या घटनेला हाच जबाबदार आहे. आणि दोषी मिळाल्याचे समाधान त्यांना मिळतं. जे प्रतिस्पर्धी आहे तर त्यांना वाटतं हिशोब बरोबर करण्याची ही चांगली संधी आहे. माध्यमांना व्हूज हवे आहेत.

Continues below advertisement

दिव्यकिर्ती म्हणाले..

मुलं ज्या मानसिक अवस्थेतून जात आहेत त्यामुळे त्यांना मी त्यांच्यासोबत का उभा राहिलो नाही, असा प्रश्न पडला. मुलांनी नाराज होणं स्वाभाविक आहे. पण तळघर सिल केल्याची कारवाई जवळपास 50 संस्थांवर झाली. त्यात एक नाव आमचं हे आहे. कदाचित त्यांना माझ्याकडून जास्त अपेक्षा असल्यामुळे त्यांना वाईट वाटलं. हे स्वाभाविक आहे. उलट मी खुश आहे की सगळा दोष माझ्यावर आहे. त्यांना अजूनही मी त्यांच्यामागे उभारावं असं वाटतं...

लवकरच सर्व मुलांना भेटणार

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सगळे माझ्या मागे लागलेत, याची मला चिंता नाही. तीन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर मी बऱ्याचदा विचार करतो की जेव्हा तळघरात पाणी शिरलं असेल तेव्हा त्या मुलांवर काय ओढवलं असेल. नाका तोंडात पाणी गेलं. त्यातून काही लोक वाचले. हे खूप अवघड आहे. माझी या पूर्ण प्रकरणात त्या मुलांना मिळालेल्या अनुभवाची जाणीव करून घेणं याचा मी विचार करतोय. मला कळत नाही त्यांच्या पालकांना कसं सांगायचं. पण मी लवकरच सर्व मुलांना भेटणार आहे असं दिव्यकिर्ती म्हणाले.

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI