Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) घरात कलाकारांसोबत रील स्टार्सचाही समावेश करण्यात आला आहे. रील स्टार 'गुलिगत धोका' फेम सूरज चव्हाणने (Suraj Chavan) बिग बॉसच्या घरात प्रवेश करून सगळ्यांनाच धक्का दिला. पहिल्या दोन दिवसात सूरज चव्हाण एकटा पडला असल्याचे चित्र दिसत होते. आता मात्र, घरातील काही सदस्य सूरजला सांभाळून घेत असल्याचे दिसून येत आहे. नॉमिनेशन, नॉमिनेटचा शब्द उच्चारण्यास अडचण येणाऱ्या सूरजला पॅडी कांबळे आणि धनंजय पोवार यांनी मोठ्या भावाप्रमाणे स समजावून सांगितले.
रील स्टार असणारा सूरज चव्हाण अजूनही बिग बॉसच्या घरात खुलला नसल्याचे दिसते. घरातील सदस्यांसाठी त्याने आपलं एक गाणं सादर केले. 'बिग बॉस'च्या घरात दुसऱ्या दिवशी घरातील काही सदस्यांसोबत बोलताना सूरजने आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल सांगितले. त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियावरही त्याची क्लिप व्हायरल झाली.
सूरजची का घेतली शिकवणी?
'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाण मागे राहू नये यासाठी काही सदस्य त्याची मदत करत आहे. नॉमिनेशन कसं बोलायचं असा प्रश्न सूरजला पडला आहे. त्याला या शब्दांचा उच्चारही व्यवस्थित करता येत नाही. घरातील बाथरुम एरियात धनंजय पोवार अर्थात डीपी, पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी त्याला हे शब्द कसे उच्चारायचे यासाठी मोठ्या भावाप्रमाणे समजावत आहेत.
नॉमिनेशन शब्द उच्चारण्यासाठी डीपी सूरजला काही उदाहरणे देत असतो. टॉमी प्रमाणे नॉमी हा शब्द उच्चार असे डीपी सांगतो. त्यानंतर नॉमिनेट हा शब्द उच्चारण्यासाठी पॅडी सूरजला आयडिया देतो. ज्याप्रमाणे इंटरनेट बोलतोस तसाच त्यातील नेट हा शब्द घेऊन नॉमिनेट असे बोलायचे, असे पॅडी सांगतो. तू प्रयत्न करतोय असे लोकांना दिसायला नको का, असे डीपी सूरजला समजावतो.
सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असलेला सूरज चव्हाण याने टिकटॉक आणि त्यानंतर इन्स्टा रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. 'गुलिकत धोका' असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर सूरजचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो.