CUET PG 2022 Last Date : कॉमन यूनिवर्सिटी एंट्रेंस टेस्ट (CUET PG 2022) म्हणजेच सामान्य विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज 10 जुलै संपणार आहेत. त्यामुळे यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवारांना 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी त्वरीत अर्ज दाखल करावा.
CUET PG 2022 संदर्भातील महत्त्वाच्या तारखा
- अर्जाची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19 मे 2022
- अर्जाची करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
- अर्जासाठीचे शुल्क : 11 जुलै 2022
- अर्ज दुरुस्त करण्याचा कालावधी : 12 जुलै ते 14 जुलै 2022
अर्ज सुधारण्याची सुविधा
NTAकडून CUET PG 2022 साठी अर्ज करणार्या उमेदवारांना अर्ज सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 12 जुलै ते 14 जुलै या कालावधीत उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना चुका झाल्यास उमेदवार अर्ज दुरुस्त करु शकतात.
CUET PG 2022 साठी अर्ज कसा कराल?
- पायरी 1 : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी NTA च्या cuet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- पायरी 2 : आता होमपेजवर CUET PG 2022 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- पायरी 3 : येथे प्रथम नोंदणी करून नंतर अर्ज करा.
- पायरी 4 : अर्जात दिलेली माहिती सविस्तर आणि योग्य प्रकारे भरून अर्ज समाविष्ट करा.
- पायरी 5 : भविष्यात आवश्यक असल्यासं अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्जाचे शुल्क
यासाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील (Gereral Category) आरक्षिण नसणाऱ्या उमेदवारांना 800 रुपये शुल्क आकारले जाईल. ओबीसी (OBC) आणि जनरल (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच SC/ST किंव तृतीयपंथी उमेदवाराला अर्जासाठी 550 रुपये आणि PWBD प्रवर्गातील उमेदवाराला 500 रुपये शुल्क भरावं लागेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI