Commerce Stream Career Options After 12th : नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2022 Declared) झाला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल तर लागला. परंतु, आता जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी मात्र, करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत. खरंतर, ही चिंता ज्यांनी मेरिट लिस्टमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे त्यांनाही आहे आणि जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही आहे. याचसाठी बारावीनंतर पुढे कोणता करिअर पर्याय निवडावा यासाठी आम्ही तुम्हाला वाणिज्य शाखेतील (Commerce) काही पर्याय सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता. 


बारावीनंतर वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी : 



  • फायनान्स (finance)

  • बँकिंग (banking)

  • Taxation

  • मानवी संसाधने (human resources)


वाणिज्य हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फायनान्शीयल अकाऊंटींग, बिझनेस मॅथेमॅटीक्स ॲण्ड स्टॅटिस्टीक, बिझनेस इकोनॉमीक्स, कम्प्युटर फंडामेंटल ॲण्ड अप्लीकेशन आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.


B.com in Travel and Tourism :     


हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम असून, मार्केटींग ॲन्ड सर्व्हीस मॅनेजमेंट, इंडियन कॉन्स्टीट्युशन ॲण्ड ह्युमन राईट्स, इंडियन फायनांन्शीयल सिस्टम आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.


बी.कॉम. इन कम्प्युटराईज्ड अकांउंटींग :


हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम अभ्यास आहे. किमान 45 टक्क्यांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रिंसीपल ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस इकोनॉमीक, फायनान्शीयल अकांऊंटींग, बिझनेस लॉ, बिझनेस स्टॅटिस्टीक आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. ॲक्सीस बँक, टीसीएस, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, आयबीएम, एचसीएल इ. नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते. 


बी.कॉम. इन फायनान्स ॲण्ड अकांऊंट :


हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम अभ्यास आहे. यास प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फायनान्शीयल अकांउंटींग, बिझनेस मॅथेमॅटीक्स, बिझनेस इकोनॉमिक, प्रिन्सीपल ऑफ मॅनेजमेंट, कम्प्युटर फंडामेंटल आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. अमेरिकन एक्सप्रेस, एचडीएफसी बँक, इंडिया बुल्स, एसबीआय लाईफ, युएई एक्सचेंज आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.


बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज :


देशातील विविध विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. हा तीन वर्षांचा पदवीधर अब्यास आहे. 


वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर करिअरच्या संधी 


अकाऊंटंट, फायनान्शिअल अॅनालिस्ट, अकाऊंट एक्झिक्युटिव्ह, विमा सल्लागार, तसेच विविध बॅंकांच्या परीक्षा देऊन तुम्ही बॅंकर देखील होऊ शकता. 


महत्वाच्या बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI