मुंबई : पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ( PG medical courses) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2022-23 साठी पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (PG medical courses for 2022-23) कट-ऑफ गुण कमी करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व श्रेणींच्या कट ऑफ मार्क्समध्ये 25 टक्के कपात केली जाणार आहे.    






2022-23 साठी पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कट ऑफ कमी करण्यास केंद्राने सोमवारी मान्यता दिली. गेल्या शैक्षणिक सत्रात झालेल्या पीजी समुपदेशनात मोठ्या संख्येने जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे सर्व श्रेणींमधील कट-ऑफ गुणांमध्ये 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.  14 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत NMC ने 2022 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशासाठीच्या टक्केवारीत कपात करण्याची शिफारस केली होती. सर्व श्रेण्यांमध्ये कट-ऑफ गुण 25 ने कमी केल्यास सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी सुधारित पात्रता  कटऑफ 25 टक्के राहिल.  


सर्व श्रेण्यांमध्ये कट-ऑफ गुण 25 पर्सेंटाईलने कमी केल्याने सामान्य श्रेणीतील अर्जदारांसाठी सुधारित पात्रता टक्केवारी/कटऑफ 25 टक्के असेल, सामान्य श्रेणीतील (PWD-जनरल) दिव्यांग व्यक्तींसाठी ते 20 टक्के असेल आणि SC/ST/OBC आणि SC/ST/OBC वर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी 15 टक्के असे अशी माहिती सूत्रानी दिली आहे.


कट ऑफ कमी झाल्याने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्यामुळे प्रवेश घेऊ इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कट ऑफ कमी होणे गरजेचे होते. त्यामुळेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने कट ऑफ कमी करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली होती. या शिफारशीचा विचार करून केंद्राने कट ऑफ कमी करण्यास मंजूरी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Byju's Layoff : Byju's कंपनीचा मोठा निर्णय, 2 हजार 500 कर्मचाऱ्यांना देणार 'नारळ', तर 10 हजार शिक्षकांची करणार नियुक्ती  


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI