CBSE Warns About Term 2 Exam Fake Notice : आजकाल सोशल मीडियावर CBSE टर्म 2 परीक्षा 2022 शी संबंधित सूचना देणारी (CBSE fake notice) एक नोटीस फिरत आहे. याबाबत गंभीर दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाने (CBSE) इशारा देत आवाहन केले आहे की, ही नोटीस बनावट आहे आणि त्यात दिलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका.
नोटीसमध्ये काय लिहिलंय?
सीबीएसईच्या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या या बनावट नोटीसमध्ये 27 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे आणि परीक्षेच्या शेवटी काय करावे अशा अनेक सूचना यात देण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “परीक्षा सुरू झाल्यानंतर न वापरलेल्या प्रश्नपत्रिका लगेच पॅक कराव्यात. तसेच सकाळी 11.30 नंतर परीक्षा केंद्रात कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
सीबीएसईकडून स्पष्ट
सीबीएसईने या बनावट नोटीसचे छायाचित्र ट्विटरच्या माध्यमातून 'फेक न्यूज अलर्ट'सह शेअर केले आणि बोर्डाने अशी कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचे स्पष्ट केले. या नोटीसमध्ये परीक्षेच्या वेळी पाळण्यात येणारे नियम तर सांगितले आहेतच, शिवाय उत्तरपत्रिका कशा पॅक करायच्या? याचीही माहिती देण्यात आली आहे. CBSE ने अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अशी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. CBSE ने टर्म दोन परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे किंवा परीक्षेच्या शेवटी काय करावे यासारख्या कोणत्याही सूचना जारी केल्या नाहीत (CBSE term 2 fake notice alert) असं सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
26 एप्रिलपासून परीक्षा सुरू
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या टर्म 2 च्या परीक्षा उद्यापासून 26 एप्रिलपासून सुरू झाल्या आहे. सीबीएसई बोर्डाने या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत असणार आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षा 2022 पूर्वी वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु, यावेळी देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI