CBSE Fake News : सध्या विविध शिक्षण मंडळांकडून परीक्षांच्या (Exam) तारखा जाहीर झाल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या सीबीएसई (CBSE) ते सीआयएससीई (CISCE) या बोर्डांच्या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याची बातमी मिळत आहे. मात्र ही बातमी केवळ अफवा असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर काही जण अशा बातम्या पसरवत असल्याचं समोर आलंय. दरम्यान, CBSE बोर्ड 2023 च्या परीक्षेचे वेळापत्रक सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) यासंदर्भात नोटीसही जारी केली आहे. व्हायरल झालेल्या वेळापत्रकात परीक्षेच्या तारखांचा उल्लेख असून ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचं समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय?



CBSE कडून नोटीस जारी


सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. त्यात म्हटलंय की, परीक्षांच्या वेळापत्रकाच्या अनेक आवृत्त्या प्रसारित केल्या जात आहेत, ज्या बनावट आहेत. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत माहितीची प्रतीक्षा करावी. सध्या, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्या जाणार्‍या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या परीक्षेच्या तारखा बनावट आहेत. असं सीबीएसईने म्हटलं आहे. 



"अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवा"


सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, CBSE बोर्डाची डेटशीट लवकरच प्रसिद्ध केली जाईल, ती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना तपासता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे व्हायरल करण्याचंही काम करू नका. असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


 प्रात्यक्षिक परीक्षा कधीपासून सुरू होणार? 


CBSE ने नुकतीच 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 जानेवारीपासून होणार आहेत. दुसरीकडे, 15 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच अधिकृत वेबसाइटवर तपासा. असं आवाहन सीबीएसई कडून करण्यात आलं आहे. 


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Agriculture News : 25 वर्षाच्या शेतकऱ्याची कमाल, सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचं उत्पन्न, वाचा कुंडलच्या प्रतिकची यशोगाथा


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI