CBSE Board 10th-12th Exams 2024 Time Table : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) लवकरच CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. जे उमेदवार यावेळी CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसले आहेत ते परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. वेळापत्रक (Timetable) पाहण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट विद्यार्थी cbse.gov.in. या संकेतस्थळावर (Website) पाहू शकतात. तसेच, वेळोवेळी परीक्षेच्या संदर्भात अपडेट्स मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही वेबसाईट तपासणं गरजेचं आहे. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. 


नवीनतम अपडेट काय आहे?


मीडिया रिपोर्ट्सवरनुसार, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्या जाऊ शकतात असा अंदाज आहे. नोव्हेंबर महिना संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत, त्यामुळे परीक्षेची तारीख आता केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत संकेतस्थळावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 


या संभाव्य तारखा असू शकतात


हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे की CBSE बोर्डाने अद्याप सिद्धांत परीक्षेच्या (Theory Paper) तारखांची कोणतीही अधिकृत माहिती पाठवली नाही. जानेवारी महिन्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exams) घेण्यात येणार असून थिअरी परीक्षांबाबत या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, यामध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत माहिती येण्यापूर्वी निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.


रिलीझ झाल्यानंतर 'अशा' प्रकारे डाऊनलोड करा 



  • CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वात आधी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. 

  • याशिवाय, तुम्ही cbse.nic.in ला देखील भेट देऊ शकता.

  • येथे लेटेस्ट नावाच्या विभागात जा आणि 10 वी किंवा 12 वी च्या वेळापत्रकावर क्लिक करा ज्यासाठी तुम्हाला बघायचे आहे.

  • असे केल्याने डेटाशीट उघडेल.

  • येथून परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे हे विद्यार्थ्यांनी तपासावे.

  • तुम्ही या वेळापत्रकाची डाऊनलोड करून प्रिंट आउट देखील घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर पाहू शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


SSC Recruitment 2024 : SSC भरतीची नोंदणी प्रक्रिया सुरू, 26 हजारांहून अधिक रिक्त जागा; पद आणि पात्रता, जाणून घ्या सर्व काही


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI