CBSE Board Exam 2024 date Announced: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी (CBSE Board 10th Exam) आणि सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा (CBSE Board 12th Exam) पुढील वर्षी 15 फेब्रुवारीपासून होणार आहेत. CBSE इयत्ता दहावी आणि CBSE इयत्ता बारावीची डेटशीट बोर्डाकडून नंतर प्रसिद्ध केली जाईल. गेल्या शुक्रवारी CBSE दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. निकालाची अधिसूचना जारी करताना, CBSE बोर्डाकडून सांगण्यात आलं की, "बोर्डानं 2024 च्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून घेण्याचा निर्णय घेतला आहे." परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जाऊन परिपत्रक पाहू शकतात. 


सिंगल मोडमध्येच परीक्षा


CBSE बोर्डानं 12 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2024 मध्ये CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा एकाच पद्धतीनं घेतल्या जातील. कोविड काळात सीबीएसई बोर्डानं दहावी, बारावीची परीक्षा दोन टर्ममध्ये आयोजित केली होती.


2022 पासून सुरूये ट्रेंड


गेल्या वर्षी देखील CBSE बोर्डानं दहावी आणि बारावी 2022 च्या निकालांसोबतच CBSE बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखांची घोषणा केली होती. हा ट्रेंड फॉलो करत यावर्षीही सीबीएलई बोर्डाकडून यंदाही सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी 15 फेब्रुवारीपासून घेण्यात आल्या होत्या. 2022-2023 या शैक्षणिक वर्षासाठी प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. 


12 मे रोजी सीबीएसई बोर्डानं इयत्ता बारावी आणि दहावीचे निकाल जाहीर केले. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 1.28 टक्क्यांनी निकाल घसरला. तर बारावीच्याही निकालाचा टक्का यंदा घसरल्याचं पाहायला मिळालं. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25 टक्के मुलं उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहे.


निकालाची प्रिंट काढण्यासाठी काय कराल? 



  • निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे cbse.gov.in वर जा.

  • इथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE दहावी निकाल 2023 लिंक वर.

  • नवीन पेज ओपन होईल. उमेदवारांना या पेजवर त्यांचे लॉगिन तपशील एन्टर करावे लागतील.

  • रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील एन्टर करा आणि सबमिट बटण दाबा.

  • असे केल्यास निकाल तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर दिसतील.

  • इथे निकाल चेक करा, डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI