CBSE 12th Class Result 2021 : येत्या आठवड्यात सीबीएसई (CBSE) बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावला जाणार याचा फॉर्म्युला जाहीर केला जाऊ शकतो. यासाठी 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला 14 जून म्हणजेच, आजपर्यंत आपला अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांचं निकालासंदर्भातील माहिती जाहीर करणार आहे. 


बारावीचे निकाल कसे लावणार, हे ठरवण्यासाठी समितीची स्थापना


दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं केलं जाणार, हे ठरवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीमध्ये शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी विपिन कुमार यांच्यासह 12 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. सीबीएसईनं 4 जून रोजी या संदर्भातील नोटीफिकेशन जाहीर केलं होतं. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी हे नोटीफिकेशन जारी करताना सांगितलं की, या समितीमध्ये 12 सदस्य आहेत. ही समिती विद्यार्थ्यांचे निकाल आणि त्यांची मार्कशीट तयार करण्यासाठी नियमावली तयार करणार आहे. 


14 जूनपर्यंत कमिटीला सोपवणार अहवाल


सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, समितीला 10 दिवसांच्या आत आपला अहवाल तयार करण्यास सांगितलं होतं. यानुसार, ही समिती शिक्षण मंत्रालयाकडे 14 जूनपर्यंत 12वीचे निकाल तयार करण्याचा फॉर्म्युला जाहीर करणार आहे. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर केला जाणार, यासंदर्भातील माहिती जाहीर केली जाईल. 


ऑब्जेक्टिव इव्हॅल्यूएशन क्रायटेरियाच्या आधारे जारी करणार बारावीचा निकाल 


दरम्यान, 1 जून रोजी कोरोना महामारीमुळे सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसई आता ऑब्जेक्टिव इव्हॅल्यूएशन क्रायटेरियाच्या आधारावर बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. तसेच बारावीच्या निकालांबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना पत्र लिहलं आहे . सिसोदिया यांनी पत्रातून विद्यार्थ्यांना दहावी आणि अकरावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर करण्याचा सल्ला दिला होता. 


28 जून प्रॅक्टिकल आणि इंटरनल असेसमेंटचे मार्क अपलोड करण्याची शेवटची तारिख 


केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं सीबीएसईनं बारावीच्या प्रॅक्टिकल आणि आंतरिक मुल्यांकनाचे आकडे अपलोड करण्याची शेवटची तारिख 28 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईनं ज्या शाळांनी आतापर्यंत बोर्डाचे प्रॅक्टिकल आणि आंतरिक मूल्यांकनाचे गुण नोंदवलेले नाहीत, त्यांनी 28 जूनपर्यंत हे गुण सीबीएससीकडे नोंदवायचे आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI