CBSE 10th Result 2022 Date : सीबीएसई (CBSE) बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशातील जवळपास सर्व राज्यांचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतु, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी निकालाच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 जुलै 2022 रोजी दहावीच्या टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक ते दोन दिवसांत बारावीचाही निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CBSE मॅट्रिक टर्म 2 परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरच्या मदतीनं CBSE निकाल तपासू शकतात.  


यावर्षी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी तर 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई 15 जुलैपर्यंत सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करु शकतं. दहावीचा निकाल बारावीपूर्वी जाहीर होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅट्रिकचा निकाल 15 जुलै रोजी घोषित केला जाण्याची शक्यता आहे. दहावी किंवा बारावी निकालाच्या तारखेबद्दल सीबीएसईकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निकालाच्या तारखेचा मागील पॅटर्न बोर्डानं पाहिल्यास, सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन किंवा तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करतं. 


सीबीएसई बारावी बोर्ड निकालानंतर महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख ठरवा, यूजीसीचे निर्देश


सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतरच देशभरातील विद्यापीठ शिक्षण संस्थांनी पदवीच्या प्रथम वर्ष  अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख ठरवावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाचे देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने विद्यापीठ शैक्षणिक संस्थांनी पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही, हा निकाल जाहीर होण्यासाठी आणखी वेळ लागणार असून साधारणपणे महिन्याभराचा वेळ लागू शकतो.  त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शैक्षणिक संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता यावा आणि त्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याचा विचार करून विद्यापीठ शिक्षण संस्थांनी या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ठरवावी. या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशातील सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत.


CBSE निकाल 2022 कुठे पाहाल? 


CBSE कडून त्यांची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbresults.nic.in वर निकाल जाहीर करेल. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉक वेबसाइट किंवा अॅप, उमंग अॅप आणि results.gov.in वर दहावी, बारावीचे निकाल पाहू शकतात. 


कसा पाहाल निकाल? 


सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbresults.nic.in भेट द्यावी
त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
आता विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर टाकावा. 
त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. 
खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थी त्यांची गुणपत्रिका डाऊनलोक करु शकतात. 
निकालाची प्रिंटआउट काढा. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI