CAT 2022 Registration : जर तुम्ही CAT परीक्षा देणार असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. सामायिक प्रवेश परीक्षा (CAT) 2022 साठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख आहे. CAT साठी नोंदणी आज संध्याकाळी 5 वाजता बंद होणार आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही (CAT 2022 Registration) ते परीक्षार्थी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. CAT 2022 परीक्षा 27 नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल आणि उमेदवारांचे प्रवेशपत्र 27 ऑक्टोबर रोजी जारी केले जाईल
दोन तासांच्या तीन सत्रांमध्ये परीक्षा
27 नोव्हेंबर रोजी CAT 2022 प्रत्येकी दोन तासांच्या तीन सत्रांमध्ये आयोजित केले जाईल. पेपरमध्ये शाब्दिक क्षमता, रिडिंग कॉम्प्रेशन, डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल थिंकिंगमधून प्रश्न विचारले जातील. पोस्ट ग्रॅज्युएट बिझनेस प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी कॅट 2022 घेण्यात येत आहे.
कोण अर्ज करू शकतो?
या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी. सामान्य आणि OBC नॉन-क्रिमी लेयर उमेदवारांसाठी, किमान 50% सह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांनी किमान 45% गुणांसह बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
अर्ज शुल्क
CAT 2022 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 1150 रुपये द्यावे लागतील. तर, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 2300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल
CAT 2022 Registration : परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी?
-सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
-आता वेबसाइटवर दिलेल्या नवीन उमेदवार नोंदणीवर क्लिक करा.
- त्यानंतर जन्मतारीख, मोबाइल नंबर, देश आणि ईमेल सबमिट करून नोंदणी करा.
- वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर परत जा आणि आता नोंदणीकृत उमेदवार लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा.
-आता यूजर आयडी आणि पासवर्ड सबमिट करा-
- त्यानंतर अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
-सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ICAI ने CA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर, 'या' तारखेपासून होणार परीक्षा, जाणून घ्या
- JEE Advanced Result 2022: IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला, 29 विद्यार्थी टॉप 100 मध्ये
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI