मुंबई : कोरोना संसर्गामुळे राज्यात असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याने विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात राज्यातील शाळा बंद असल्याने या नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डी.डी सह्याद्री वाहिनीवर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शैक्षणिक तासिकांचे आयोजन केले जाणार आहे.


राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक 14 जून, 2021 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये हे आयोजन केले जाईल. दर दिवशी  5 तास (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:30 ते 3:30 या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता 10 वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता 12 वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.


सदरच्या शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. तरीसुध्दा डी.डी. सह्याद्री वाहिनीवरील सदर शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग घेतले जातील तर दुसरीकडे सुलभ पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी पर्यायी वर्ग हे सहयाद्री वाहिनीवर आयोजित केले आहेत. मागील शैक्षणिक वर्षात सुद्धा हा उपक्रम शिक्षण विभागाला परवानगी उशिरा मिळाल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी सुरू करण्यात आला होता. मात्र, यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू राहणार आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI