BJP Letter To Uday Samant For Exam : राज्यातील काही विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात होणार आहेत. या परीक्षांना भारतीय जनता युवा मोर्चानं विरोध केला आहे. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारला दिला आहे. 


मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या पत्रात  म्हटलं आहे की,  शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा. विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा. परीक्षा संपूर्ण डिस्क्रीप्टिव्ह घ्यायच्या होत्या तर मग मे महिन्यात का नाही घेतल्या? तसे झाले असते तर जुलै महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता आले असते!परंतु कोणत्याच प्रकारचे नियोजन शिक्षण मंत्र्यांनी केले नाही आणि आता सर्व विषय कुलगुरूंच्या अंगावर ढकलण्याचे काम उदय सामंत करीत आहेत, असा आरोप भाजयुमोनं केला आहे. 




निवेदनात म्हटलं आहे की, वाढता कोरोना प्रभाव, ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी उद्भवणारी पूर सदृश परिस्थिती यावर परीक्षांच्या अनुषंगाने शिक्षणमंत्र्यांनी कोणती पूर्व उपाययोजना केली आहे याचे ही उत्तर विद्यार्थी मागत आहेत. लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लावायचे असतील व नवीन शैक्षिणक वर्ष लवकर सुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भाजयुमोनं दिला आहे. 


कोरोना काळात आपण डिजायस्टर अॅक्टचा वापर करत निर्णय विद्यापीठांवर लादला आहे.  प्रत्येक विद्यापीठाच्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ लागल्या तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तुलना आपण कशी करणार. आपल्या राज्याचे विद्यार्थी इतर राज्यांच्या तुलनेत मागे राहीले तर या पापाची जबाबदारी तुम्ही घेणार का? असा सवाल देखील सामंत यांना भाजयुमोनं केला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI