नवी दिल्ली : द असोसिएशन ऑफ ऑल इंडियन यूनिवर्सिटीजकडून अल फलाह विद्यापीठाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.  त्यासाठी गुड स्टँडिंगची कमतरता असं कारण देण्यात आलं आहे. द असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटीजनं म्हटलं की त्यांच्या उपनियमानुसार सर्व विद्यापीठांनी गुड स्टँडिंग्जचं मध्ये असणं आवश्यक आहे. मात्र, मीडिया रिपोर्टसनुसार अल फलाह विद्यापीठ, फरिदाबाद हरियाणामध्ये गुड स्टँडिंग्जचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं द असोसिएशन ऑफ इंडियन यूनिवर्सिटीजकडून  अल फलाह विद्यापीठ फरिदाबाद हरियाणाचं सदस्यत्व तातडीनं रद्द करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement


 अल फलाह विद्यापीठाचं सदस्यत्व रद्द करण्यासोबत असोसिएशननं  एआयूचा लोगोचा वापर करु नये असं सांगण्यात आलं आहे. आदेशातील उल्लेखानुसार आता कोणत्याही उपक्रमात आणि कार्यक्रमात एआयूचा  लोगो  किंवा नाव वापरण्यास अल फलाह विद्यापीठाला मनाई करण्यात आली आहे. एआयूचा लोगो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटमधून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


आज दुपारपर्यंत सुरु असलेली अल फलाह एजूय इन वेबसाईट देखील डाऊन करण्यात आली आहे. द नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन काऊन्सिलनं अल फलाह विद्यापीठानं बनावट अॅक्रिडेटशनचा वापर केल्याचं समोर आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. अल फलाह विद्यापीठानं पहिलं नॅक न करता ए अँड ए अॅक्रिडेशन मिळाल्याचं वेबसाईटवर दाखवलं  होतं. 


अल फलाह विद्यापीठ का चर्चेत? 


अल फलाह विद्यापीठ ही फरिदाबादमधील खासगी संस्था आहे. या संस्थेतील दोन डॉक्टरांचा दिल्ली स्फोटात हात असल्याचं समोर आलं होतं. डॉ. उमर  ऊन नबी आणि डॉ. मुझम्मील  शकील या दोघांचा दिल्ली कार स्फोटात समावेश आहे. दिल्लीतील लाल किल्ला येथील स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता. 


नवी दिल्ली येथे 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ  मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ कारचा स्फोट झाला होता. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर  30 हून अधिक जण जखमी झाले होते.  


नवी दिल्लीतील स्फोटानंतर  अल फलाह विद्यापीठातील 52 जणांची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यापाठाचा स्टाफ, विद्यार्थी  यांची फरिदाबाद पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. डॉ. मुझम्मील सोबत काम करणाऱ्या जवळच्या सहकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली होती.


दरम्यान, नवी दिल्ली येथे ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी पोलिसांकडून फरिदाबादमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान स्फोटक पदार्थांचा साठा सापडला होता. जम्मू काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI