kolhapur municipal corporation : कोल्हापूर महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदिरमधील अंजली बाबासो पाटील या विद्यार्थीनींने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चौथा क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी स्तर शिष्यवृत्ती परीक्षा सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील 13 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत.  या परीक्षेमध्ये महापालिकेच्या शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादी यश प्राप्त केले.


महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांनी विशेष असे उपक्रम राबविलेने या  शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होवू लागले आहेत. महापालिकेच्या शाळेत  सराव चाचण्या, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मॉडेल पेपर विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेणे असे विविध उपक्रम राबविले गेले. यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा यावर्षीही कायम राखला आहे.


महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदिच्या अंजली बाबासो पाटील हिने (97.31 %) गुण मिळवून चौथा क्रमांक, सना रमजान वडगावे हिने (96.64%) गुण मिळवून पाचवा क्रमांक, समिता राहूल मांडरे हिने (95.9732%) गुण मिळवून सहावा क्रमांक, प्रणाली सुहास पसाळे हिने (94.63%) गुण मिळवून आठवा क्रमांक व अंजली निलेश भद्रे हिने (93.95%) गुण मिळवून नववा क्रमांक पटकाविला. 


श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरच्या तेजस बसंदास नोळे याने (95.97%) गुण मिळवून सहावा क्रमांक, कुमार समर्थ चंद्रकांत कुंभारने (95.30%) गुण मिळवून सातवा क्रमांक, समिक्षा संतोष आलुगडे हिने (95.30%) गुण मिळवून सातवा क्रमांक व समृध्दी विजय केंद्रे हिने (95.30%) गुण मिळवून सातवा क्रमांक, शिवम दिपक पाटील याने (94.63%) गुण मिळवून आठवा क्रमांक, मंजिरी संताजी चव्हाण हिने (94.63%) गुण मिळवून आठवा क्रमांक, अनिश मोहन शिर्के याने (93.95%) गुण मिळवून नववा क्रमांक पटकविला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिरच्या रेहाना म.सफिक शहा हिने (93.95%) गुण मिळवून नववा क्रमांक पटकावला.


महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर 29, टेंबलाईवाडी विद्यामंदिर 19, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर2, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी 3, महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी 2, श्री जोतिर्लिंग विद्यामंदिर 2,  नेहरुनगर विद्यामंदिर 1, सावित्रीबाई फुले विद्यामंदिर 1, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर 1, तात्यासो मोहिते विद्यामंदिर 1 अशा 61 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे. 


पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी स्तर, माध्यमिक इयत्ता 8 वी स्तर शाळेतील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेतील महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील एकत्रित निकालात इयत्ता 5 वी मधील 115 विद्यार्थी व इयत्ता 8 वीमधील 62 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन गरुड भरारी घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शक करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्राथमिक शिक्षण समितीकडील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI