मुंबई : आतापर्यंत बारामतीकरांनी साथ दिली, पण यावेळच्या निकालाने मात्र मी आश्चर्यकारक झालो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. सगळ्यांनी काम चांगलं केलं पण मी कमी पडलो असं सांगत अजित पवारांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली. आमचा पारंपरिक मतदार मुस्लिम समूदाय आमच्यापासून दूर गेल्याने त्याचा फटका बसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. 


भाजपच्या चंद्रकांतदादांनी बारामतीत येऊन शरद पवारांच्याबद्दल केलेलं वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नसल्याची कबुली अजित पवारांनी दिली. तसेच आता झालेल्या चुका या येत्या काळात सुधारल्या जातील, दूर गेलेल्या घटकाला सोबत घेतलं जाईल असंही अजित पवारांनी सांगितलं.


काय म्हणाले अजित पवार?


जनतेशी मी संवाद साधल नव्हता. 4 जून रोजी निकाल लागला, त्यात NDA ला बहुमत मिळालं. मात्र अपेक्षा होता तो आकडा मिळाला नाही. राष्ट्रवादी बाबत बोलायचं झालं तर आम्ही मिळालेल्या आकड्यानुसार आम्ही समाधानी नाही. जनतेचा विश्वास आम्ही जिंकू शकलो नाही. मी अपयाशाची जबाबदारी स्वीकारतो. 


सकाळी आम्ही बैठक बोलावली होती, त्यामध्ये निकालाबाबत चर्चा केली. आज आम्ही आमच्या आमदारांची बैठक बोलावली. काही आमदार जे आले नाहीत त्यांची वैयक्तिक कारणं सांगितली. आमचे विरोधक म्हणतात की बैठकीला न आलेले आमदार संपर्कात आहेत. मात्र तसं काही नाही. विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे.


बारामतीबाबतच्या निकालावरून मी आश्चर्यचकित झालो. बारामतीकरांचा आजपर्यंत पाठिंबा मिळत होता. चंद्रकांतदादांनी केलेलं शरद पवारांबाबत वक्तव्य लोकांना आवडलं नाही. तेही वक्तव्य बारामतीत येऊन त्यांनी केलं.  आता ना उमेद न होता पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणार. विधानसभेला एकजुटीने काम करणार. त्यासंबंधी युतीतील मित्र पक्षांतील प्रमुखांशी संवाद साधू.


मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला, त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात संभाजीनगर सोडलं तर एकही जागा आली नाही. यातून आम्ही काही निर्णय घ्यावे लागणार ते घेऊ. जनतेने दिलेला कौल स्वीकारतो. जनतेमध्ये आमच्याबद्दल जो विश्वास कमी झाला तो पुन्हा कमावू. 


कॅबिनेटनंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, उपमुख्यमंत्री व्हिसीद्वारे होते. उद्या दिल्लीला जातोय. दिल्लीत आम्ही तीन पक्षाचे नेते यावर चर्चा करू. अपयश मिळालं म्हणून कुठे कमी पडलो हे लक्षात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्या चुका टाळू. 


मी कमी पडलो म्हणून आम्ही हरलो. अमोल मिटकरींशी मी बोललो, त्यांना चुकीचं ब्रिफिंग केलं गेलं. बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. आता कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरचं कळेल. काही भागात गुलाल उधळण्याचं काम झालंय. पण आम्ही कमी पडलो. आम्हाला 35 वर्षे निवडणुकीची सवय आहे. मागे झालेल्या चुका दुरूस्त केल्या.


संविधान बदलाच्या चर्चेचा फटका


संविधानाचा मुद्दा महत्वाचा ठरला. सत्ताधारी पक्षाचा एखादा खासदार कुठेतरी बोलायचा आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हायचं. एका खासदाराची भूमिका ही पक्षाची होतं नाही. अबकी बार 400 पार या घोषणेचंही तेच झालं. यांना 400 जागा या संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत असा संदेश गेला. 


ही बातमी वाचा : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI