Sangli Crime News:  जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची होत असलेली  मागणी आणि लग्नच जमू न देण्याची धमकी यामुळे नैराश्यात गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli) खानापूर तालुक्यातील (Khanapur) पोसेवाडी गावात घडली आहे. 
 
महेश सुभाष जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर महेशच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गावातील महिला, पुरुषांनी मोर्चा काढला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली (Police Arrested Accused) आहे. 


कुटुंबीयांनी काय म्हटले?


पोसेवाडी येथील महेश जाधवने आपल्या घराजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्देवी घटना घडली.. महेशचा एक भाऊ सुनील जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान आहे. त्याच्यावर देखील गेल्या वर्षी पोलिसात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. महेश याच्यावर राजकीय हेतू ठेवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच अंकुश ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव यांच्यासह धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते, नितीन खुडे यांनी त्याला हा खटला न्यायालयातून काढून घेण्यासाठी पाच लाख रुपये दे, नाहीतर तुझे लग्न होणार नाही तसेच न्यायालयात तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यामुळे महेशने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 


 


ग्रामस्थांचे आंदोलन 


महेशने आत्महत्या केल्यानंतर  ग्रामस्थांनी विटा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह नेत संबंधितांवर गुन्हा आणि त्यांना तात्काळ अटक होत नाही, तोपर्यंत महेश याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता.  त्यानंतर पोलिसांनी सरपंच ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  


 


पोलिसांची कारवाई 


आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच अंकुश नामदेव ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासाहेब दुशारेकर, महेंद्र मोहिते आणि नितीन खुडे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून यातील सरपंच अंकुश ठोंबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: