बेळगाव : तरुणाईमध्ये प्रेमाची क्रेझ पाहायला मिळत असून आपलं प्रेम हे शेवटपर्यंत टिकावं म्हणून प्रेमाचं लग्नात रुपांतर करुन नवी स्वप्न पाहिली जातात. मात्र, अनेकदा कुटुंबीयांचा विरोध, सामाजिक विरोधाभास आणि आर्थिक गणितं जुळत नसल्याने प्रेमातून लग्नाला अडथळा येतो. मुलीच्या पालकांची अपेक्षाही अनेकदा लग्नाला नकार मिळण्यास कारणीभूत ठरते. अर्थातच, आपल्या मुलीचा भावी जोडीदार कमावता असावा, तिला सुखी-समाधानी ठेवणारा आणि नोकरीवाला असावा अशी अपेक्षा त्यांची असते. त्यामुळे, दोघांचे एकमेकांवर प्रेम असले तरी कुटुबीयांच्या नकारामुळे ते कार्यसिद्धीस जात नाही. बेळगाव शहरातही अशीच एक प्रेमभंग झाल्याची घटना घडली आहे. युवक-युवतीचे एकमेकांवर प्रेम होते, दोघे लग्नही करण्याच्या तयारीत होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या. त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने युवकाने अगोदर प्रेयसीला संपवलं, त्यानंतर स्वत:लाही चाकू खुपसून घेत जीवनयात्रा संपवली.   

प्रेम विवाहाला विरोध केल्याने प्रियकराने आधी प्रेयसीला भोसकून स्वतःलाही भोसकून घेतल्याची घटना बेळगावातील नवी गल्ली येथे घडली आहे. प्रशांत कुंडेकर (29 वर्षे) आणि ऐश्वर्या लोहार यांचे गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. प्रशांत याने लग्न करण्यासंबंधी ऐश्वर्याच्या आईसोबत चर्चा केली होती. तिच्या आईने तू आणखी थोडे पैसे कमव मग लग्न लावून देते, असे सांगितले होते. मात्र, प्रियकराला मुलीच्या कुटुंबीयांचा हा विरोध रास्त न झाल्याने त्याने आपल्या प्रेमप्रकरणाचा असा भयानक शेवट केला.  

ऐश्वर्या आपल्या मावशीच्या घरी आली असताना प्रशांतदेखील तेथे गेला आणि त्याने पुन्हा लग्नाचा विषय काढला. मात्र, त्यावेळी, प्रशांतने चाकू काढून ऐश्वर्याला भोसकले आणि स्वतःवर देखील चाकूचे वार करून घेऊन स्वतःला संपवले. या घटनेमुळे शहरात डबल मर्डर झाल्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. दरम्यान, बेळगावचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन प्राथमिक माहिती घेतली. प्रशांतने प्रथम ऐश्वर्याला चाकूने भोसकले आणि नंतर स्वतःलाही भोसकून संपवल्याची समजले. घटनास्थळी विषाची बाटली देखील सापडली असून दीड वर्षांपूर्वीपासून दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते अशी माहिती पोलीस आयुक्तानी दिली.

हेही वाचा

धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी