Yavatmal News यवतमाळ : प्रतिबंधित बियाणे (Prohibited Seeds) विक्री प्रकरणी यवतमाळच्या कृषी विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात प्रतिबंधित बोगस बीटी बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा घालून हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. या कारवाईत 35 हजार रुपयांचे 23 बीटी बियाणे पाकीटसह 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल कृषी विभागाच्या वतीने जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने केली. ही कारवाई झरीजामनी ते पांढरकवडा रोडवर पंचायत समिती वसाहतीसमोर असलेल्या केंद्रावर करण्यात आली. यावेळी एक विधिसंघर्ष बालकासह संकल्प राजेश भोयर (वय 20 वर्ष) या दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सध्या सुरू आहे. 


लाखोंच्या मुद्देमालसह दोघांना अटक 


खरीप हंगाम तोंडावर आला कि शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात. अशातच राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. या बोगस बियाणांच्या विक्री प्रकरणी कृषी विभाग सतर्क झाले असून अशा बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवून असते. अशातच विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरीजामनी तालुक्यात प्रतिबंधित असलेले अनाधिकृत बीटी बियाण्यांची विक्री होत असल्याची गोपीनिय माहिती कृषी विभागाला मिळाली.


या माहितीच्या आधारे कृषी विभागाचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने साफळा रचत कारवाई केली. यात सुमारे 35 हजार रुपयांचे 23 बीटी बियाणे पाकीटसह 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून जिल्ह्यात अजून काही प्रतिबंधित आणि बोगस बियाणे विक्री केल्या जात आहे का, याचाही तपास घेतला जात आहे.  


तेंदूपत्ता माफीयांचा वनविभागाला लाखोचा चुना


वाशिम जिल्हा हद्दीतील तेंदूपत्ता पळवून तो अकोला वन परिक्षेत्रातील असल्याचे दाखवून वनविभागाचा  लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील धरमवाडी, माळेगाव,परिसारत हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचे बघायला मिळाले आहे. तेंदूपत्ता  माफियाकडून मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने तेंदूपत्ता तस्करी  होत असून वाशिम वनविभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न या निमत्याने निर्माण झाला आहे. 


कारवाई करत तेंदुपत्ता जप्त करण्याची मागणी


तेंदूपत्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेऊन परिसरातील नागरिकांना घाबरवण्याचा  प्रयत्न करत आहे. तर तेंदूपत्ता ठेवल्या जाणाऱ्या डेपो (फड) हा  सरकारी नियमाने हर्रास झालेल्या त्या परिक्षेत्राच्या तीन किलोमीटर अंतरात ठेवावा लागतो. मात्र, अस न करता वाशिम जिल्हा हद्दीत वन विभागाच्या  हद्दीत ठेवून वन अधिकारी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात तेंदूपत्याची  अफरातफर केली जात असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, वाशिम वनविभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. वन विभागाने या प्रकरणी कारवाई करत तेंदुपत्ता जप्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या