Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील लाहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौसाळा वनक्षेत्रात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे . एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शिक्षक असणाऱ्या तिच्या पतीला आधी विष देऊन मारलं .नंतर त्याचा मृतदेह जंगलात  निर्जन स्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला . जंगल परिसरात पतीची हत्या करून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिकेला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात तिने आपल्या क्लासमधील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचे उघड झाले असून, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Yavatmal Crime)

15 मे रोजी सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एकाव्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही दिवसांत यवतमाळ पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात मृतदेह जाळणारी व्यक्ती आरोपीची पत्नीच असल्याचे समोर आले. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 आणि 238 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंतांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख शांतनू अरविंद देशमुख अशी पटली.

पतीचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला

तपासादरम्यान पोलिसांनी त्याची पत्नी निधी देशमुख हिच्यावर लक्ष केंद्रित केले. ती इंग्रजी माध्यम शाळेची मुख्याध्यापिका आहे. सुरुवातीला तिने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशी दरम्यान तिने अपराधाची कबुली दिली. तिच्या म्हणण्यानुसार, 13 मे रोजी तिने पतीला विष दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने भावनिक गळ घालून आपल्या कोचिंग क्लासमधील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.त्या रात्री त्यांनी मिळून मृतदेह चाौसाळा जंगलात नेऊन टाकला. मृतदेह ओळखला जाण्याची भीती वाटल्याने दुसऱ्या दिवशी रात्री ती परत आली आणि मृतदेहावर रॉकेल ओतून मृतदेह जाळून टाकला.तपासादरम्यान पोलिसांनी आणि अल्पवयीन मुलांमधील मोबाईल संवादाचा मागोवा घेतला, ज्यामुळे त्यांचे गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी निधीला अटक केली असून, तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

गुगलवरून तयार केले विष

शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. लग्नानंतर काही दिवस आयुष्य चांगले चालले, पण शंतनूला दारूचे व्यसन लागले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि निधी तिच्या पतीपासून सुटका मिळवण्याचा विचार करू लागली. शंतनू हा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी निधी देशमुख ही देखील त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं. दरम्यान वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेम विवाह केला. त्यानंतर ते आई वडिलांपासून दूर राहू लागले. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. शंतनू दारू पिऊन निधीला त्रास होत होता. शंतनूच्या सततच्या त्रासाला कंटाळून निधीने त्याला संपविण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने तिच्याकडे शिकवण्यासाठी येत असलेल्या तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली.

हेही वाचा:

Yavatmal Crime News: मुख्याध्यापिकेचे लव्ह मॅरेज, वर्षभरातच बिनसलं, शिक्षक पतीला संपवलं, शाळेतल्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला, यवतमाळ हादरलं