Yavatmal News : यवतमाळच्या (Yavatmal) कोळसा खदाणीमुळे वणी (Wani) तालुक्याला राज्यभरात ओळखले जाते. परंतु, आता वणी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यात मटका, जुगार, खुले आम सुरू असून, याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (MLA Sanjivreddy Bodkurwar) यांनी केलाय. याबाबत वणी पोलीस आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः या मटका अड्ड्यावर धाड टाकून या सर्व प्रकाराची पोलखोल केलीय.


दिवसभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीला उत येत आहे. असे असताना असे प्रकार खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे आतातरी मटका ,जुगार सारखे अवैध धंदे बंद होणार का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.


भाजप आमदार स्वत:च मटका अड्ड्यावर धाडीसाठी पोहोचले!


यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मोठ्याप्रमाणात कोळसा खदान आहेत. त्यामुळे राज्यासह परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. दिवसभर मोलमजूरी करून मिळालेल्या पैशातून मटक, जुगार, सट्टा, इत्यादि अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे. परिणामी, यातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. अलिकडेच जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण ताजे असताना जिल्ह्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. अशाच एका जुगार अड्ड्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 


तुरुंग अधिकार्‍यासह कर्मचाऱ्यांला आठ न्यायाधीन बंद्यांची मारहाण


यवतमाळ येथील जिल्हा कारागृहातील प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मज्जाव केल्याने 8 न्यायाधीन बंद्यांनी चांगलाच राडा घातलाय. यात तुरुंग अधिकारी धनाजी हुलगुंडे आणि कर्मचारी सुरज मसराम यांना जबर मारहाण केलीय. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची ही खळबळजनक घटना यवतमाळच्या कारागृहात घडलीय. दरम्यान, कारागृह अधिकारी धनाजी हुलगुंडे यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार कुंडले, जुनेद फारुक शेख, सतपाल रुपनवार, नैनेश निकम, आकाश भालेराव, सोहेल मेहबूब बादशाह शेख, मनोज शिरशीकर, नामदेव नाईक अशी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत.      


इतर महत्वाच्या बातम्या