Yavatmal crime:  पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेसोबत सासरच्यांनी केलेल्या भयंकर कृत्यानंतर यवतमाळ हादरलं आहे . पती आणि मुलाच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी महिलेचा गुजराती व्यक्तीसोबत एक लाख वीस हजार रुपयांचा सौदा करत तिला विकल्याचं समोर आलं . या व्यक्तीने लग्नाच्या नावाखाली दोन वर्ष महिलेचा शारीरिक आणि मानसिक शोषण केलं .दरम्यान तिच्यापासून मूल झाल्यानंतर महिलेला तिचा गावी सोडलं . हा प्रकार समोर आल्यानंतर  पोलिसांनी महिलेच्या सासू-सासरे दीर, नणंद व तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे . 

नेमका प्रकार काय ?

यवतमाळ मधील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना समोर आली आहे .महिलेच्या पतीचा आणि मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर सासरच्या लोकांनी महिलेच्या निराधार अवस्थेचा फायदा घेत तिला रोजगार मिळवून देतो असं सांगत मध्य प्रदेशला नेलं .तिथे महिलेला  गुजराती व्यक्तीच्या ताब्यात देत एक लाख वीस हजार रुपयांना विकलं .  हे सगळं महिलेच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याने केलं . त्या व्यक्तीने महिलेचं तब्बल दोन वर्ष शारीरिक व मानसिक शोषण केलं .यातून मूल झाल्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला गावात आणून सोडलं व तो फरार झाला . याप्रकरणी 2023 साली महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती असे पोलीस सूत्रांनी सांगितलं . दरम्यान महिलेचा शोध घेत असताना हा सगळा प्रकार समोर आल्याने या घटनेला वेगळच वळण मिळालं .महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमानखाली महिलेच्या सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .महिलेचा गुजराती पती तसेच नणंद, नणंदेचा नवरा सासू सासरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे .या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे .

एकट्या पडलेल्या महिलेला गुजरातला विकलं

42 वर्षीय महिलेच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर, एकटी पडलेल्या विधवेला तिच्याच सासरच्यांनी फसवून गुजरातमध्ये विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू, सासूचा दुसरा पती, दीर आणि नणंद यांनी मिळून तिच्या विक्रीचा कट रचला होता. पीडितेच्या कबुलीनुसार, तिची विक्री सुरेश पोपटभाई चौसानी याच्याकडे 1 लाख 20 हजार रुपयांना करण्यात आली.

या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी विविध ठिकाणांहून सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात सासू दर्शना (60), सासूचा दुसरा पती गणेश नामदेव भेले (65), दीर संदीप सुभाष सुरजोशे (40)  यांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशातील मनावर येथील पूजा जितेंद्र पाटीदार (38) आणि जितेंद्र कैलास पाटीदार (45) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील मोरंबी जिल्ह्यातील हिरापूर येथील सुरेश पोपटभाई चौसानी (48) यालाही आरोपी करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

Mumbai Crime: मुंबईत मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा, भरधाव कारचं सनरुफ उघडून बाहेर आल्या अन्...