औरंगाबाद : एकीकडे व्हाट्सअॅपच्या वापरासंदर्भात निर्माण झालेले बदल आणि त्याच अनुषंगाने सामान्य भारतीयांच्या मनामध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे . तर दुसरीकडे कोरोनाच्या महामार्गामुळे वाढणारी बेरोजगारी. या पार्श्वभूमीवर चायनातील हॅकर्स आता भारतात अॅक्टिव्ह झाले. पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली व्हाट्सअॅपवर एक लिंक पाठवून सामान्य भारतीयांची महत्त्वाची माहिती गोळा करण्याचं कुटील डाव चायना खेळते आहे. त्यामुळे आपल्याही व्हाट्सअॅपवर अशी जाहिरात आली तर सावधान...


व्हाट्सअॅप वर पार्ट टाइम जॉब ऑफर.. तासात हजारो रुपये कमावण्याची संधी असे काही मेसेज आपल्या व्हाट्सअॅप वर आले असतील तर सावधान. कारण अशा प्रकारचे मेसेज थेट चायनातून पाठवले जात असल्याचं समोर आलंय. चायना भारतीयांवर पाळत ठेवण्याचा कुटील डाव खेळत आहे. भारतीय डिजीटल वर्डमध्ये चायनाची ही एक प्रकारची घुसखोरी आहे. खऱ्या अर्थानं सायबर वॉर फेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स वॉर फेअरची ही सुरुवात आहे. चिनी हॅकर्स 'अर्धवेळ' जॉबच्या आश्वासनासह भारतीय व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.


चायनाने सप्टेंबर 2020 मध्ये देखील शेन हुवा या डेटा कंपनीच्या माध्यमातून दहा हजारापेक्षा जास्त महत्वाच्या भारतीय लोकांचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशा पार्ट टाइम जॉबच्या लिंक पासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे.


सायबर पीस फाऊंडेशन आणि ऑटोबोट इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेडच्या तज्ज्ञांसह या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. असं असलं तरी चीन हा अतिशय प्रगत देश आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाने या गोष्टीकडे गंभीरपणेपणे पाहण्याची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी सोशल मीडियाचा वापर कसा जबाबदारीने करावा ही विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे.