Beed Crime:बीडमधील खंडणी ते मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडाच्या (Walmik Karad) संपत्ती विषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे .वाल्मीक कराडच्या हाडेल हप्तीचा आता कहर झाला असून स्वतःची जमीन चांगली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतला मुरूम उपसल्याचा आरोप होत आहे . बीडच्या मांजरसुंबा येथे वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या ज्योती जाधव यांच्या नावावर 9 एकर जमीन असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे .एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप ज्योती जाधव यांच्यावर गावातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे . (Santosh Deshmukh Case)
ज्योती मंगल जाधव ही महिला वाल्मीक कराड याची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात हडपसरमधील अमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये 3 फ्लॅट्स असल्याचीही माहिती आहे . शिवाय पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करून ज्योती मंगल जाधव च्या नावे दोन ऑफिस स्पेस खरेदी केल्याची माहितीही समोर आली आहे . याशिवाय वाल्मीक कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याचेही उघड झाले आहे .(Beed Crime)
वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे मांजरसुंब्यात 9 एकर जमीन
खंडणी ते हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात 9 एकर जमीन असल्याचं समोर आल्यानंतर स्वतःची जमीन चांगली करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून मुरूम उपसा केल्याचा गंभीर आरोप गावातील शेतकऱ्यांनी केलाय .
दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यवधींचे फ्लॅट्स, आलिशान ऑफिस
वाल्मीक कराडचे पिंपरी चिंचवड मध्ये दोन आलिशान फ्लॅट असून दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यवधींचे फ्लॅट्स ,लक्झरी टाऊनशिपमध्ये महागडे ऑफिस घेतल्याचं समोर आलं आहे . खंडणी ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असणारे वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर बीड मधील मांजरसुंबा येथे नऊ एकर जमीन आहे . फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत कोट्यवधींची दोन ऑफिस स्पेस आहे . पुण्यातील अमनोरा पार्क टाऊनशिप मध्ये 3 फ्लॅट आहेत . संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मीक कराड यांच्यासह ज्योती जाधव यांचीही चौकशी करण्यात आली होती . हत्या प्रकरणानंतर वाल्मीक कराड सुरुवातीच्या दिवसात ज्योती जाधव कडे राहायला होता अशी ही माहिती या चौकशी दरम्यान समोर आली होती .
हेही वाचा:
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Walmik Karad: वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप एपनिया' आजार नेमका काय आहे? पुरुषांना धोका अधिक? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...