Beed Crime Walmik Karad: मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला सध्या बीड (Beed) जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. गेले तीन दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिसचा संसर्ग (Infection) झाल्याची माहिती आहे. सिस्टायसिस (Cystitis)  मूत्राशयाचा आजार आहे. यामध्ये मूत्रमार्गात बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो. वाल्मिक कराड याला अशाच आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे. (Santosh Deshmukh Murder case)

Continues below advertisement

बीड जिल्हा रुग्णालयातील पथकाने वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला सलाईन लावण्यात आली असून त्याची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाल्मिक कराड याला वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

Beed News: बीड कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत

काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद झाला होता. या वादातून वाल्मिक कराड गँगमधील सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि शंकर शेप यांनी अझर पठाण याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कैद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या कैद्याने एका व्यक्तीशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून त्याने गंभीर आरोप केले होते. माझ्या हाताला गंभीर मारहाण झाली. जेल प्रशासन माझं काहीही ऐकत नाही. त्यांनी पैसे घेतले आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. जेलर यांना याबाबत माहिती दिली, पण त्यांनी काहीही ऐकून घेतलं नाही. उलट माझ्यावर दमदाटी करून जेल बदली करण्याची धमकी  दिली. याची तक्रार कुठेही करा, माझं काहीही वाकड होत नाही अशी धमकी जेलरने दिली. जेलमध्ये मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. मला दवाखान्यात देखील घेवून जाण्यात आले नाही. वाल्मिक अण्णाकडे मला बोलावलं जात आहे, असे संबंधित कैद्याने म्हटल्याचे ऑडिओ क्लीपमधून समोर येत आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

Walmik Karad: वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप एपनिया' आजार नेमका काय आहे? पुरुषांना धोका अधिक? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...