वसई : नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चारचाकी वाहनाला बसलेल्या कटवरुन झालेल्या वादात एका ट्रक ड्रायव्हरला (Truck Driver Murder) आपला जीव गमवावा लागला. ट्रक ड्रायव्हरने काढलेल्या शेवटच्या त्या मोबाईल क्लिपवरुन आरोपींची कार आणि त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. सध्या याप्रकरणी नायगाव पोलिसांनी (Vasai News) चौघांना अटक केली आहे.
आजच्या या वर्दळीच्या आणि रहद्दारीच्या रस्त्यावर कधी कुठल्या गाडीला धडक बसेल, कट लागेल हे सांगता येणार नाही. माञ या किरकोळ कारणावरुन कुणी चक्क वाहनचालकाला ठार मारेल हे माञ भयावहक आहे. ही घटना वसईजवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामागार्गावर घडली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमध्ये मारेकऱ्याचे व्हिडीओ आणि कारचा फोटो काढल्याने पोलिसांना आरोपी पकडणं सोपं झालं.
ट्रकचे नुकसान करत केली मारहाण
मयत रामकिशोर पुशवाह असं 40 वर्षीय ट्रक चालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान तो कंपनीचा गॅसने भरलेल्या टँकर घेऊन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन गुजरातच्या दिशेने जात होता. मालजीपाडा येथे ब्रिजखाली एका चारचाकी वाहनाला त्याच्या गाडीचा कट लागला. या कटमध्ये कारचे थोडे नुकसान झाले. मात्र वाहनातील चौघांनी रामकिशोर यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद आहे. सोमवारी कंपनीत बोलून भरपाई दिली जाईल, तुम्ही इन्शुरन्स क्लेम करा असं रामकिशोर यांनी सांगितल्यावरही कारमधील चौघांचही समाधान झालं नाही. त्यानंतर चौघे कारमधून खाली उतरले आणि रामकिशोरच्या ट्रकच्या दगडाने काचा फोडल्या आणि त्याल याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत उपाचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
घटनेनंतर चौघेही आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा कलम 304 , 427, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सोमवारी दुपारी सर्बेस्टीन कृष्णा वालतुपरमबिल, उत्सव ब्रिजकुमार शर्मा, विकी अशोक बारोट आणि विवेक महेंद्र पवार या चौघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नालासोपारा येथे राहणारे आहेत.
हे ही वाचा :