वसई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक आणि ठाणे पोलीस आक्तालयातील खंडणीविरोधी पथकाचे तत्काळीन पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमिरे यांच्या विरोधात तक्रार घेण्यास विरार पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप विरार मधील मयुरेश राऊत यांनी केला आहे.


2017 मध्ये मयुरेश राऊत यांच्या दोन गाड्या जबरदस्तीने ठाणे खंडणी विरोधी पथकाने  घेऊन गेले असल्याचा आरोप तक्रारीत आहे. गाड्या चोरी, अपहरण, जिवीतास धोका असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासर्व घटनांची तक्रार दाखल करून, तपास करावा. तसेच तपास होईपर्यंत मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयुरेश राऊत यांच्या तक्रारीत आहे. 


मला मनसुख हिरण व्हायचे नाही. म्हणून मी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमीरे यांच्या विरोधात तक्रार देतोय. पण माझी तक्रार कुणी घेत नसल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या गाड्यात अनेक गुन्हे घडले असल्याचेही राऊत यांनी आरोप केला आहे.


पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमीरे यांच्याशी फोनवर बोलणं झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर समृध्दी महामार्ग प्रकल्पातील कथित भ्रष्टाराची ध्वनिफित वायरल झालेल्या प्रकरणाचा तपासाप्रकरणी त्यांना चौकशीला बोलावलं होतं. राऊत यांच्या आरोपाच त्यांनी खंडण केलं आहे.