मुंबई: वसईच्या गौराईपाडा परिसरात मंगळवारी एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आरती यादव असे या मृत तरुणीचे नाव असून रोहित यादव (Rohit Yadav) या तरुणाने लोखंडी पान्याने 15 घाव घालत तिची हत्या केली होती. या प्रकरणी बुधवारी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चिञा वाघ (Chitra Wagh) यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा श्रींगी-चौगुले आणि आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची भेट घेतली. गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर आचोळे पोलीस ठाण्यात मृत तरुणी आरती यादव हिच्या आईची ही भेट घेतली. तरुणीच्या हत्याकांडप्रकरणी (Vasai Murder Case) पोलीसांचा तपास योग्य रितीने सुरु असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपी रोहित विरोधात शनिवारी एन.सी.दाखल केल्याचं सांगितलं आहे. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी चांगलात चांगला वकील आम्ही देऊ. तसेच समाजाने अशा घटनेच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता पुढे यायला पाहिजे, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले.
नेमकं काय घडलं?
झालेली घटना दुर्दैवी आहे, पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडवणारी आहे, मी आता सीसीटीव्ही फुटेज बघितलं. त्यामध्ये मी मुलीची पार्श्वभूमी जाणून घेतली, तिच्या पालकांशी बोलले. त्यावेळी हे लक्षात आलं की, मुलगा-मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. 8 तारखेला मोबाईल फोडला म्हणून तो भरुन पाहिजे, ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलिसांनी त्यांना बोलावून घेतलं, जरा दम दिला. दम दिल्यानंतर मुलीने सांगितले की, तुम्ही काही बोलू नका, आम्ही समजून घेतो. मग ते बाहेर पडले तरी पण पोलिसांनी वन फोर्टी नाईन ची नोटीस बजावली त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये आणि त्यानंतर ते घरी गेले नऊ तारखेनंतर 17 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिच्या तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही 17 तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला त्याच मुलाचा आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला, तू परत तक्रार करू नको पोलीस स्टेशनला. कारण पोलिसांनी सांगितलं होतं की, जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही, असं दम देऊन पाठवलं आणि तो फोन कट झाला आणि 18 तारखेला मात्र त्याने तरुणीची हत्या केली. मला इथे एवढंच सांगायचं आहे की, याच्यामध्ये दहा दिवसांमध्ये काही तक्रार नव्हती, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात, मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी लग्न करणार होते पण नंतर तिच्या संपर्कात दुसरा कोणीतरी मुलगा आला. त्याच्याबद्दल मुलाने त्याच्या आईवडिलांना, तिच्या सांगितलं, त्या संबंधित मुलालाही सांगितलं, कुठून काही रिस्पॉन्स आला नाही. या दहा दिवसांमध्ये त्याने दोनदा आत्महत्येचा पण प्रयत्न केला त्या मुलाने, अशी पण माहिती समोर येते. त्याच्यानंतर कुठलाच काही रिस्पॉन्स आला नाही आणि नंतर त्याने हे जे टोकाचे पाऊल उचलले. समर्थन कुठल्याच गोष्टीला नाही, शिक्षा तर शंभर टक्के होणार, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
या घटनेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घातले आहे. कमिशनर साहेबांशी ते बोलले आहेत, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. सकाळी मी डीसीपी मॅडमना भेटले. त्याच्यामुळे आरोपी सुटणार नाही, चांगल्या चांगल्या वकील देव फाशीची शिक्षाही होईल ही घटना होत असतानाही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघायची भूमिका घेतली हे मात्र फारच दुर्दैवी आहे. मला हे सांगायचे तुमच्या माध्यमातून ही काही पहिली घटना नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता या घटनेत सुद्धा एक मुलगा आला होता वाचवायला बाजूचे दोघेजण उभे होते त्यात तिघांनी मिळून त्या मुलाला जरी मदत मिळाली असती तर आज मुलगी वाचली असती. म्हणजे समाजाने सुद्धा फक्त बघायची भूमिका न घेता अशा जर काही घटना घडल्या तर पुढाकार घेतला पाहिजे. कारण ही विकृती आहे, हा विकृतपणा आहे आणि या विकृतपणाला रोखले पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
पोलिसांनी कारवाई केली होती पण...
ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला फक्त बघायची भूमिका न घेता समाजाने सुद्धा पुढे येणं गरजेचे आहे आणि जर आले असते तर ती मुलगी नक्की वाचली असती. मी मुलीच्या आईशी पण बोलले, बिहारचे आहेत ती लोकं इथं पोटापाण्यासाठी आले. मुलगी सुद्धा त्या ठिकाणी काम करून घराचा उदरनिर्वाह करायची आणि त्यामुळे ही घटना घडली ही अतिशय वाईट आहे. अशा घटना होऊ नये म्हणून मी आता पोलिसांशी बोलले. बाळासाहेब पवार इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी मला काही पत्रकं दाखवली बऱ्यापैकी तो जो एरिया आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय लोक जास्त राहतात. कष्टकरी वर्ग त्या ठिकाणी आहे वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन वेगळी वेगळी पत्रक वाटणे कुठल्या अडचणीमध्ये येऊ नका कोणी फसवताय तुमच्या मुलांची काळजी घ्या काही असेल तर पोलिसांना त्या ठिकाणी संपर्क करा अशा बाबतच्या सूचना या सततच्या त्या ठिकाणी दिल्या जातात.
या प्रकरणात पोलिसांनी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जी घेतलेली आहे 149 ची जी नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे हे पोलिसांनी त्यांचे काम त्या ठिकाणी केलंय. झालेली घटना ही दुर्दैवी आहे या घटना होऊ नये भविष्यामध्ये यासाठी तुम्हाला मला आणि आपल्याला सगळ्यांना सज्ज होणे गरजेचे आहे. या राज्यातल्या मुली वाचवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला अशा घटना दिसतात त्यावेळेला आपण धावलं पाहिजे कोण ओळखीचा आहे किंवा नाही याची परवा न करता पोलीस तर पोहोचलेच आणि तो मुलगा तिथेच बसलेला होता. दहा मिनिटात पोलिस पोचले त्याने केलेला गुन्हा कबूल केलाय. आणखीन इन्वेस्टीगेशन चालू आहे. मोबाईल फोन वगैरे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन काय असेल त्या गोष्टी समोर येतील च परंतु चांगल्यात चांगला वकील त्या ठिकाणी देऊन या नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होईल एवढं मात्र नक्की, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
आणखी वाचा