रायगड : उरणधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीच्या हत्येनं राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केलीय. दरम्यान, या हत्याप्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले आहे.


दाऊद करायचा ब्लॅकमेल? 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊद शेख आणि यशश्री शिंदे हे एकमेकांना ओळखायचे. यशश्री शिंदे दाऊदला भेटायला गेली होती. मात्र त्या दोघांत वाद झाला. शेवटी रागाच्या भरात दाऊदने तिच्यावर चाकूने वार केले आणि यातच यशश्री गतप्राण झाली. हत्येनंतर दाऊद घटनास्थळावरून पळून गेला. त्याने थेट कर्नाटक गाठले. कर्नाटकहून तो केरळमध्ये जाणार होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला केरळला पळून जाण्यापूर्वीच कर्नाकटमध्ये पकडले. 


दाऊद शेखकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो? 


दाऊद शेख याच्याकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते, असा दावा केला जातोय. मराठी वृत्तपत्र लोकमतने तसे वृत्त दिले आहे. याच आक्षेपार्ह फोटोंच्या मदतीने दाऊद यशश्रीला ब्लॅकमेल करायचा. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी उरणला आला होता. 25 जुलै दाऊद आणि यशश्री एकमेकांना भेटले होते. पण याच भेटीत दोघांमध्ये वाद झाले आणि रागाच्या भरात दाऊदने तिची हत्या केली. 


यशश्री फोन गायब


यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद घटनास्थळाहून पसार झाला होता. यशश्रीचा मोबाईल फोन गायब आहे.  घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदने तो लपवला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस याच फोनचा शोध घेत आहेत. यशश्रीचा फोन आढळल्यास त्यातून अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. कदाचीत याच फोनमधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. 


भेटायला जाऊ नको, मित्राचा सल्ला


दरम्यान, यशश्रीच्या मित्राने तिला दाऊदला भेटायला जाऊ नको असा सल्ला दिला होता. दाऊद हा मानसिक धक्क्यात आहेत. त्यामुले त्याला भेटणे योग्य नाही, असे त्याने यशश्रीला सांगितले होते. पण भेटीतून काही मार्ग निघेन असे यशश्रीला वाटले होते. त्यामुळे ती दाऊदला भेटायला गेली होती. मात्र दाऊदने चाकूने तिची हत्या केली.


हेही वाचा :


हत्येच्या काही तासांपूर्वी यशश्री गेली होती मैत्रिणीच्या घरी, पोलिसांना सापडला महत्त्वाचा दुवा, अनेक प्रश्नांचा उलगडा होणार?


मोठी बातमी : यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण 3-4 वर्षात भेटले नव्हते, भेटल्यानंतर वादातून हत्या, पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!


Navi Mumbai Crime: मोठी बातमी : यशश्री शिंदेची हत्या नेमकी कशी केली, पोलिसांनी थरारक अँगल सांगितला