Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये दारुड्या रिक्षा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिली होती. या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रिक्षा चालकाला  मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मद्यधुंद रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना मारहाण केल्यानंतर रिक्षा चालकांनी पळ काढलाय. यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. 


रिक्षा चालकाची वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण 


अधिकची माहिती अशी की, रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले होते. रिक्षा चालकाशी विचारपूस केली रिक्षा चालक मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. रिक्षा चालकाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस  रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलीस आणि वॉर्डन यांनी देखील रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. पोलीस मोहन पाटील यांना मारहाण झाल्यानंतर ते जमिनीवर पडले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


रिक्शा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिली. या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले. ऑटो चालकाला मध्यवर्ती पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. दोन रिक्षा चालकांनी  पोलिसांना मारहाण करुन पळ काढला आहे. यामध्ये पोलीस जखमी झाले आहेत. रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता. वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस घटनस्थळी पोहोचले आणि सुरू असलेला वाद  मिटवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी सुरु केली होती.


बंगळूरमध्येही रिक्षा चालकाची महिलेला अरेरावी 


बंगळूरमध्येही रिक्षा चालकाने महिला प्रवाशाला अरेरावी केल्याची घटना आज समोर आली होती. ऑटो राईड रद्द केल्यामुळे रिक्षाचालक महिला प्रवाशावर भडकलेला पाहायला मिळाला. त्याने थेट महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रिक्षाचालक शिवीगाळ करण्यावरच थांबला नाही, त्याने महिलेच्या थेट कानशि‍लात लगावली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 




 इतर महत्वाच्या बातम्या


उलटी केल्याच्या रागातून प्रेयसीच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव; आरोपीला 9 सप्टेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी