कल्याण - डोंबिवली : डोंबिवली रामनगर पोलीसानी व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. नंदू राय आणि अर्जुन निर्मल अशी या दोन तस्करांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 725 ग्राम वजनाची उलटी जप्त केली असून त्याची किंमत 1 कोटी 60 लाख रुपायांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान तपासादरम्यान या दोघांचा आणखी एक साथीदार असून तोच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.या दोघांनी ही उलटी कुठून व कुणाला विकण्यासाठी आणली होती याचा शोध पोलिस घेत आहेत .
 

  
व्हेल माशाच्या उलटीचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो. ही परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. व्हेल माशाची उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्या उलटीला फार महत्त्व असून तिची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. डोंबिवलीच्या बंदिश पॅलेस परिसरामध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण पोलिस उपायुक्त पथक व डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाने एपीआय गणेश जाधव, बळवंत भराडे, दिनेश सोनवणे, पोलिस हवलदार विशाल वाघ ,संजय पाटील ,पोलिस नाईक ऋषिकेश भालेराव आदींनी या परिसरात सापळा रचला होता. दोन जण या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. त्या परिसरात दबा धरून असलेल्या रामनगर पोलिसांच्या पथकाने या दोघांना हटकले. त्यांची झडती घेतली असता  त्यांच्याकडून व्हेल माशाची 725 किलो वजनाची उलटी आढळून आली.


याप्रकरणी स्थानिक डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत नंदू राय आणि अर्जुन निर्मल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचीही समोर आली आहे. तोच मुख्य सूत्रधर असल्याचा संशय पोलिसाना असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. त्यांनी ही उलटी कोणाकडून आणली व ते कोणाला विकणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत.