मुंबई : टोरेस गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या घोटाळ्या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. व्हैलेन्टीना कुमार, तानिया आणि सर्वेश सुर्वे या तिघांना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी आज हजर करण्यात आलं होतं. या सुनावणी दरम्यान कोर्टाने निरिक्षण नोंदवत चौकशी पूर्ण झाल्यानं अधिक रिमांडची गरज नसल्याचं म्हटले आहे. तर आरोपी व्हॅलेंटिना कुमार आणि सर्वेश सर्वे आता जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.
सन्माननीय विशेष न्यायालय मुंबईच्या सत्र न्यायालयाने टोरेस गैरव्यवहार प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या खटल्यातील व्हैलेन्टीना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी मी एड. रवी जाधव, राजेश टेके आणि इतर सहकारी त्यामध्ये पात्र झालो असून आगामी काळात आम्ही या संदर्भात बेल अर्ज दाखल करू अशी माहिती एड. रवी जाधव यांनी दिली आहे.व टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या 2 हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे. तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंहून अधिकाची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे.
टोरेसचा भांडाफोड कसा झाला?
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 5 जानेवारीला दादरच्या टोरेसच्या शोरुममध्ये एका बैठकीत कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनात पगारावरुन वाद झाला. त्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी पगाराबाबत चिंता व्यक्त करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यांच्या सोबत काही गुंतवणूकदार देखील पोलीस स्टेशनला पोहोचले आणि हे प्रकरण पुढं आलं.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. उझबेकिस्तानची नागरिक तानिया कसातोव्हा, रशियाची वॅलेंटिना गणेश कुमार, सर्वेश सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. जॉन कार्टर, ओलेना स्टोइन आणि विक्टोरिया फरार आहेत. टोरेसचे अकाऊंटट अभिषेक गुप्ता यांनी डिसेंबर महिन्यात 100 पानांचा एक मेल पोलिसांना केला होता. ज्यामध्ये टोरेस संदर्भातील अनेक गोष्टी पोलिसांना कळवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, मुंबई, नवी मुंबईतील जवळपास अंदाजे सव्वा लाख गुंतवणूकदारांनी टोरेसमध्ये पैशांची गुंतवणूक केली असून काही जणांनी कर्ज काढून देखील यामध्ये पैसे गुंतवले होते.
हे ही वाचा