मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात दररोज नवनवे आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. हल्लेखोरांनी गोळीबारासाठी देशी कट्टा नव्हे, तर अत्यंत महागड्या इंपोर्टेड पिस्तूलचा वापर केला होता. मात्र, गोळीबाराच्या ऐन वेळी तुर्की-मेड 'झिगाना' (Zigana) पिस्तूल लॉक झाल्याने आरोपींचा प्लॅन फिसकटला आणि मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दोन्ही पिस्तूलं गुजरातमधून जप्त केली असून, ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

Continues below advertisement

दरम्यान, या घटनेनंतर टायगर श्रॉफ तीव्र मानसिक धक्क्याखाली असून तो प्रचंड अस्वस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात रविवारी तीन हल्लेखोरांनी टायगरच्या कारवर अंधाधुंद गोळीबार केला होता. माझं कोणाशीही वैर नसताना माझ्यावर हल्ला का झाला? असा सवाल टायगरने पोलिसांना विचारल्याची माहिती आहे. मानसिक धक्का बसल्यामुळे मुंबई गुन्हे शाखेला अजूनही त्याचा सविस्तर जबाब नोंदवता आलेला नाही.

Tiger Shroff Case Arrests : इंदूरमधून 11 वा आरोपी अटकेत

या हाय-प्रोफाइल प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आणखी एका आरोपीला इंदूरमधून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या आता 11 वर पोहोचली आहे. या आरोपीने इतर हल्लेखोरांना रसद आणि मदत पुरवल्याचा संशय आहे. त्याला लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. दुसरीकडे, किल्ला कोर्टाने जतीन, समीर आणि अंकित या तिन्ही आरोपींना 28 तारीखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Continues below advertisement

Signal Telegram App Conspiracy : चॅटिंग अॅप्सवरून सूचना अन् टीव्ही न्यूजवरून मेसेज

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमृतसरमधून पिस्तूल आणणाऱ्या कुणाल आणि सुमित या आरोपींना पिस्तूल ठेवलेल्या जागेचे लोकेशन आणि फोटो पाठवण्यात आले होते, जे नंतर लगेचच डिलीट करण्यात आले. आरोपींशी संपर्क साधण्यासाठी सिग्नल, टेलिग्राम, मोबाईल नंबर आणि झिंगाडा अॅप्सचा वापर करण्यात आला होता. सर्व सूचना अनिल पंडित नावाचा हँडलर देत असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, टीव्हीवर बातम्या प्रसारित होताच "चेहरे समोर आले आहेत, पळून जा" अशा सूचना हँडलर्सकडून आरोपींना दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही बातमी वाचा: