Tiger Shroff Attack Accused: बॉलिवूड अभिनेता (Bollywood) टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हल्ला प्रकरणात पोलिसांना (Police) बरेच धागेदोरे सापडत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांना एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff Attack) हल्ला प्रकरणी शूटर्सना फोन आणि मेसेजद्वारे माहिती मिळत असल्याची अपडेट समोर आली आहे. बातम्या आणि सोशल मिडिया पोस्ट पाहून  आरोपींना पोलिसांच्या तपासाच्या अपडेट्स वेळोवेळी दिली जात होती, अशी माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

शूटर्सना फोन अन् मेसेजद्वारे मिळायची माहिती (Shooters Received Updates Through Phone Calls and Messages)

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शूटर्सना  फोन आणि मेसेजद्वारे अपडेट्स मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.   बातम्या आणि सोशल मिडिया पोस्ट पाहून आरोपींना पोलिसांच्या तपासाची अपडेट्स मिळत होती. आरोपींचे फोटो आणि व्हिडीओ टीव्हीवर झळकताच एका शूटरला  “चेहरे आ गए हैं, निकल जाओ”, असा मेसेज हँडलरने केल्याचे तपासातून समोर आले आहे.

दरम्यान,  टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आणखी काय आढळत आहे? आरोपींचा हल्ला करण्यामागे मुख्य हेतू काय होता? हे तपासातून उघड होईल. मिळालेल्या माहितीनुसार, या भयंकर हल्ल्यात टायगर श्रॉफ सुखरूप असून,  या दोन जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि व्लॉगर (टायगर श्रॉफचा चाहता) गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

फायरिंग प्रकरणात फूल सिंग, रेहान अन्सारी आणि हृतिक महतो यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत आरोपींची संख्या एकूण 10 असल्याची माहिती आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी शूटर्सना अपडेट्स देणारा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का? याचा तपास आता  पोलिसांकडून सुरू आहे. टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात आता  कोणकोणती माहिती उघड होणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

KBC Madhuri Dixit Amitabh Bachchan: KBCमध्ये माधुरी दीक्षितच्या एका प्रश्नाने अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात दाटले अश्रु; आईच्या आठवणीत बिग बी काय म्हणाले?

Sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar Marriage: 'तिच्या कामाच्या प्रेमात मी आधी पडलो'; सचिन पिळगावकरांनी सुप्रिया यांना लग्नाची मागणी कधी घातली? सांगितला किस्सा