Mumbai Gambling : मुंबईत (Mumbai) जुगाराचे (Gambling) अड्डे चालवणारे मुख्य व्यक्ती आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Crime Branch) रडारवर आहेत. मुंबईत दाखल झालेल्या जुगार अड्डा प्रकरणातील गुन्ह्याचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करणार आहे. शहरातून मटका (Matka Gambling) आणि जुगार हद्दपार करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.


मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अशा प्रकरणांमध्ये सुमारे 14 गुन्हे दाखल केले आहेत. जुगार खेळणाऱ्या किंवा आकडे आणि नंबर घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु जुगाराचा अड्डा चालवणारे मुख्य आरोपी कोणत्याही खटल्याशिवाय मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष सेल तयार केला आहे. हा सेल बेकायदेशीरपणे जुगार अड्डा चालवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.


मटका आणि जुगार चालवणाऱ्या मोठ्या जुगारींचाच बंदोबस्त केल्यास शहरात चालणाऱ्या मटक्याला आळा बसेल असं वरिष्ठ पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातून मटका आणि जुगार हद्दपार करण्यासाठी पोलीस ठाण्याबरोबर गुन्हे शाखा देखील मैदान उतरले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं.


गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिटचे मिळून एक पथक तयार करण्यात आलं असून युनिट 5 चे प्रभारी पोलिस निरीक्षक घनःश्याम नायर हे या पथकाचे नेतृत्व करत आहेत. जुगाराचे अड्डे जे पूर्वी शहरातील रस्त्यांच्या कानाकोपऱ्यात सुरु होते. बदलत्या काळानुसार ते पोलिसांपासून सुरक्षित राहून ऑनलाईन होऊ लागले आहेत. त्यामुळे आता या जुगाऱ्यांना पकडून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करणाऱ्या अड्ड्यांवर आळा घालण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा आता कंबर कसणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या






Pune Crime News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एकाच वेळी 8 जुगार अड्ड्यावर छापे, 11 लाखाचा मुद्देमाल जप्त; 94 जणांवर गुन्हा दाखल