ठाणे : दीड वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी दिवाजवळ खाडी किनार्‍यावर एका लाल कलरच्या पत्र्याच्या पेटीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता आणि एकच खळबळ उडाली. त्यावेळी पोलिसांना कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडले नाहीत. ती व्यक्ती कोण आहे? याची माहिती नसताना देखील डायघर पोलिसांनी या मृत्यूचा 24 तासात उलगडा केलेला आहे.


13 तारखेला दिवा येथील खाडी किनारी एका पत्र्याची पेटीत एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या हाती कुठलेही पुरावे नसल्याने आणि मृतकाच्या चेहरा ओळखू येत नसल्याने मृत व्यक्ती कोण आहे? त्याची शहानिशा झाली नाही. मग पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आणि ही लाल रंगाची पत्र्याची पेटी आली कुठून या दिशेने तपास सुरु केला. यासाठी डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तयार केलं आणि ही पथकं विविध दिशेने रवाना झाली. तपासादरम्यान पोलिसांना कळाले की, ही पेटी मुंबई येथून 30 तारखेला एका महिलेने खरेदी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या गुन्ह्याचा उलघड झाला आणि त्याच महिलेने हत्या केल्याचे समोर आले आहे.


हत्या करणारी महिला अनिता यादव ही विवाहित असून तिला पहिल्या पतीपासून 3 मुले आहेत. परंतु आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळी तिन्ही मुलांना गावी घेऊन गेले. त्यानंतर ती एकटी पडली. अनिता ही एका ठिकाणी घरकाम करण्यासाठी जात असताना तिची ओळख मयत मनीष यादवसोबत झाली. त्यानंतर ते दोघे दीड वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहू लागले. अनिताने मयत मनीष याच्या मागे लग्नसाठी तगादा लावला होता. मात्र मनीष याचे लग्न गावी त्याच्या आईवडिलांच्या संमतीने होणार होते याचाच राग मनात धरून अनिताने आपला भाऊ विजय भिल्लारे याच्या मदतीने हत्येचा कट रचला. मयत मनीष हा गाढ झोपेत असताना पाहिल्यांदा या भावा बहिणीने त्याचा ओढणीने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्याच्या डोक्यात हतोड्याने प्रहार करून त्याला ठार केले. याप्रकरणी डायघर पोलिसांनी अनिता यादव आणि विजय भिल्लारे या दोघांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता या दोन्ही आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :