Thane Bhiwandi latest Crime News Update:  गरोदर पत्नीचा गर्भपात करण्यासाठी सासरा सोनोग्राफी सेंटरमध्येच घेऊन गेल्याच्या संशयातून जवायाने सासऱ्यावर सोनोग्रॉफी सेंटरमध्येच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही शहापूर शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये घडल्याने सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी हल्लेखोर जावयावर शहापूर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. शरद सुदाम निचिते असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर जवायाचे नाव आहे. तर शशिकांत एकनाथ दुभेळे (वय 52) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे सासरे हे शहापूर तालुक्यातील दहिगाव  गावाचे  पोलीस पाटील आहेत. 


शहापूर तालुक्यातील दहिगावचे पोलीस पाटील शशिकांत दुभेळे यांची मुलगी प्रज्ञा हिचा विवाह 26 एप्रिल 2020 रोजी शहापूर तालुक्यातील  पाषाणे गावात राहणाऱ्या  शरद निचिते याच्याशी झाला आहे. मात्र पती   शरद हा नेहमीच आपली पत्नी प्रज्ञा हिला मारहाण करत असे, त्यातच पत्नी  पज्ञा  गरोदर असल्याने तिला नेहमी मारहाण करत असल्याने  तिचे जन्माला येणारे बाळ कमकुवत असल्यामुळे ते दगावले.  असे  सासरे शशिकांत यांना वाटत होते. त्यामुळे ७ जानेवारी रोजी सासरे हे आपल्या मुलीसह आरोपी जवाईला घेऊन शहापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यातच आरोपी पतीला सासऱ्यावर गर्भपाताचा संशय घेत, जीवेठार मारण्याची नातेवाइकांसमोर  धमकी दिली. मात्र त्यावेळी नातेवाईकांनी दोघांचे वाद त्याच वेळी सोडवले होते.


त्यानंतर  9 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास  आपल्या गरोदर मुलीला  घेऊन  सोनोग्राफी करण्यासाठी  शहापूर शहरातील पंडित नाक्यावर असलेल्या  आस्था सोनोग्राफी सेंटरमध्ये गेले होते. दुसरीकडे आरोपी जावयाला पत्नीचा गर्भपात करण्यासाठी नेल्याचा संशय आल्याने   माथेफिरू जावई शरद निचिते हा थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये पोहचला. त्यानंतर त्याने सासऱ्याशी वाद घालत  माझ्या  पत्नीला गर्भपात करण्यासाठी   घेऊन आला का ? असा  गैरसमज करून  सासऱ्यावर  लोखंडी रॉडने हल्ला करत असताना कोणीच भाडणं सोडविण्यासाठी येत नसल्याचे पाहून जीव वाचविण्यासाठी सासरने डॉक्टरांच्या केबिनमध्ये धाव घेतली.  मात्र  या हल्ल्यात  सासऱ्याला  जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात  भादवि कलम 324,504,506 अंतर्गत हल्लेखोर जावाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  या गुन्ह्याचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.